नाराज खासदार संजय पाटील भाजप सोडणार? त्यांनीच केले स्पष्ट

MP Sanjay Patil यांनी नितीन गडकरी यांच्यासमोरच दिली कबुली.
MP Sanjay Patil
MP Sanjay Patilsarkarnama

सांगली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या सांगली जिह्ल्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने तेथील राजकारणातही खळबळ नेहमीप्रमाणे उडाली. खासदार संजय पाटील यांनी येथील शेतकरी मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सांगली जिल्ह्याला गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांसाठी व ताकारी, टेंभू, म्हैसाळ तसेच रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण या कामासाठी मोठा निधी मिळवून दिल्याबद्दल गडकरी यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. डाळिंब आणि बेदाण्याचा हार घालून हा सत्कार करण्यात आला. सांगलीच्या भिवघाट येथे खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या मेळाव्याच्या निमित्ताने खासदार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी नाराज असल्याच्या अफवा नेहमी परसविल्या जातात. मात्री भाजप सोडून जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्याविषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.

MP Sanjay Patil
मंत्र्यांना अडचणीत कोण आणते..गडकरींनी सांगितली ही तीन नावे..

यावेळी नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर मधून दुष्काळी भागातील तलावातील पाणी पाहिले. ते पाहून आनंद झाल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली. ते म्हणाले, ``मी पण शेतकरी आहे. विदर्भात अनेक शेतकऱ्यांनी गळ्याला खाज सुटली म्हणून आत्महत्या केली नाही तर पाण्याचे संकट असल्याने केली. पाण्याचं महत्व फार मोठे आहे. देशात पाण्याची कमी नाही..पावसानंतर पुराने नुकसान  होते. आपल्या देशात पाण्याचे नियोजन होत नाही. त्यामुळे या साऱ्या घटना घडत असतात.``

``स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी शेतकरी समाधनी नाही. कापसाला दर नाही. मात्र कापडाला दर मिळतो. 75 वर्षांनंतर 20 टक्के जनता खेडी सोडून शहरात गेली. पैसा मिळत नाही तोवर शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. शेतीचा विकास करायचे असले तर पाणी पाहिजे. ताकारी, टेंभू म्हैसाळ या योजनांसाठी 5182 कोटी देऊन 77 हजार हेक्टर पाण्याखाली आले.. पाण्यामुळे हास्य आले पण आपल्या भागात कोल्ड स्टोरेज काढली आहेत. जगाच्या मार्केटमध्ये डाळींब किलो, अर्धा किलोत विकले जातात.  जगात चालणारी द्राक्ष, डाळिंब यांच्या जाती आता शेतकऱ्यांनी शोधल्या पाहिजेत,``अशी सूचना त्यांनी केली.

MP Sanjay Patil
रामराजेंना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढावी लागणार... नेत्यांनीच दिले संकेत

साखर कारखान्यांची परिस्थिती चांगली नाही. देशाला 280 लाख टन साखर दरवर्षी लागते. मागील वर्षात 360 लाख टन तयार केली. मात्र साखर विकता येत नाही. कारखाने बंद पडायला लागले आहे.. साखर कमी करा, हे साखर कारखानदारांना समजावून सांगितले. ब्राझीलमध्ये पुढल्या वर्षी साखर पिकली तर अडचण होईल, कारखानदाराचे चेहऱ्यावरचे हास्य पळून जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

पुढच्या काही वर्षांत 15 लाख कोटींची आॅटोमोबाईल इंडस्ट्री तयार होत आहे. त्यामुळे इथेनॉलचे पंप टाका. शेतकरी ऊर्जादाता बनेल तर जगेल. अन्नदाता राहील तर मरेल, असेही गडकरी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in