सतारुढ गटाला दणका देत खासदार मंडलिकांनी उधळला गुलाल

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत.
Sanjay Mandlik

Sanjay Mandlik

Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (KDCC Bank Election) प्रक्रिया संस्था व पतसंस्था गटात मोठी चुरस पाहायला मिळाली. या गटातून खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे विद्यमान संचालक निवडून आले आहेत. त्यांनी सत्तारूढ गटातील मदन कारंडे व प्रदीप पाटील-भुयेकर यांचा पराभव केला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.

राज्यात आघाडीवर असणाऱ्या काही जिल्हा बॅंकांमध्ये कोल्हापूर बॅंकेचा क्रमांक वरचा आहे. ही बॅंक ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या पॅनेल तसेच शिवसेनेच्या पॅनेलने शर्थीने निवडणूक लढवली आहे. प्रचारात आलेल्या रंगतीप्रमाणेच मतदानही 98 टक्के झाले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.

<div class="paragraphs"><p>Sanjay Mandlik</p></div>
आता काँग्रेसच्या मंत्र्यांनीच दिल्या मोदी जिंदाबादच्या घोषणा..!

सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadravkar) आणि गणपतराव पाटील यांच्यात होती. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेंद्र यड्रावकर यांना 98 मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना 52 मते पडली.

निवडणुकीत विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील, भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील, आजरातून सुधीर देसाई, शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड या सत्तारूढ गटाचे चार उमेदवार विजयी झाले. शाहुवाडीतून विद्ममान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर तर आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी मंगळवारी (ता. 5) चुरशीने मतदान झाले, त्यानंतर कोण-कोणत्या गटात चुरस होईल, याची चर्चा जिल्हाभर सुरु आहे. बॅंकेच्या शिरोळ संस्था गटातून उमेदवार असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मतदान झाल्यानंतर लगेच विजयी जल्लोष केला होता. तसेच, त्यांच्या विजयाचे डिजिटल फलकही झळकले होते. यड्रावकर यांच्याविरोधात गणपतराव पाटील यांनीही तेवढ्याच ताकदीने प्रचार करुन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. शिवाय त्यांच्या पाठीशी आपली ताकद लावून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com