खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राजेंद्र राऊतांमध्ये रंगला कलगी तुरा!

फोन उचलला नाही तर मीच आता एक लाखाचे बक्षिस देणार आहे.
Omraje Nimbalkar, Rajendra Raut
Omraje Nimbalkar, Rajendra Rautsarkarnama

बार्शी : केंद्रामध्ये राजाभाऊ तुमचे भाजपचे (BJP) सरकार आहे. तर राज्यामध्ये आमचे शिवसेनेचे (Shiv Sena) सरकार आहे. तुम्ही वर वजन वापरा मी खाली वजन वापरतो अन् तुमच्या आणि माझ्या मतदारसंघ असलेल्या बार्शीचा आपण सक्षमपणे विकास करु, असे प्रतिपादन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केल्याने उपस्थितांनी त्यांनी भरभरुन दाद दिली. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुमारे साडेअठरा कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ अन् लोकार्पण सोहळा मंगळवारी निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी झालेल्या भाषणांमध्ये अनेक राजकीय गणिते मांडण्यात आली.

Omraje Nimbalkar, Rajendra Raut
ST कर्मचाऱ्यांसमोर बोलताना आमदार राऊतांचा गौप्यस्फोट : ...यामुळेच मी शिवसेना सोडली

महिन्याला वारी करतो दिल्लीची पण मोदी साहेबांनी कोरोनामुळे आमचा निधीच थांबवला. जेव्हा सुरू होईल त्यावेळी तेव्हा निश्चित भरभरून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मी मतदार संघात नेहमी येतो पण पूर्वी बार्शीची जनता म्हणायची खासदार दाखवा हजार रुपये मिळवा. उस्मानाबादसाठी मेडिकल कॉलेज मंजूर केले असून प्रत्येक नागरिकांचा फोन उचलतो, उचलला नाही तर परत करतो तर नागरिकच म्हणतात चुकून लागला...फोन उचलला नाही तर मीच आता एक लाखाचे बक्षिस देणार आहे असे खासदार ओमराजे म्हणताच एकच हशा पिकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पालखी मार्ग लोकार्पण सोहळा पार पडला. त्यासाठी मी राजाभाऊ सोबतच गेलो होतो. संत गोरोबा काका पालखी मार्ग व्हावा यासाठी गडकरी साहेबांना निवेदन दिले आहे. राजाभाऊ कधी दिल्लीला जायचे तुम्हीच ठरवा असे खासदार निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी याप्रसंगी खासदार ओमराजे आपल्याला मदत करणारच आहेत. गप्प बसणार नाहीत बार्शीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिले आहे. मतदार संघाचे खासदार म्हणून आपल्या पाठीशी आहेत. शिवसेना-भाजपची युती तुटली ही दुर्देवी घटना असून आज सत्ता असती तर वेगळे चित्र दिसले असते. राज्य सरकार तुमचे आहे ओमराजे आमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही ढाल म्हणून आमच्या पाठीशी उभे राहावे अडचण येणार नाही. याची दक्षता घ्या गडकरी साहेबांकडे तुमच्याकडील रस्त्याचे प्रश्न असतील तर आपण भेटू असेही आमदार राऊत यांनी खासदार ओमराजे यांना यावेळी सांगितले.

Omraje Nimbalkar, Rajendra Raut
उदयनराजेंना साताराच्या नेत्यांनी खेळविले... पण त्यांनीही शिवेंद्रराजेंना `गाठलेच!`

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भरभरुन मदत केली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याने बार्शीकरांची अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. आमदार प्रशांत परिचारक आणि तत्कालीन विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्यात सर्वात जास्त निधी बार्शीसाठी दिला होता. ही आठवण यावेळी राऊत यांनी बोलून दाखवली. शहराच्या विकासासाठी विरोधकांनीही प्रयत्न करावेत, शंभर कोटी आणावेत त्यांची सत्ता आहे. आम्ही त्यांचेदेखील अभिनंदन करु असे सांगत राऊत यांनी रोजगार निर्मिती करुन बेकारी हटवायची आहे. बार्शीचे नंदनवन करावयाचे आहे, असे मनोगत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com