खासदार सदाशिव लोखंडेंच्या कुंडलीत पुन्हा राजयोग?

भाजपने शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीची संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
Sadashiv Lokhande
Sadashiv LokhandeSarkarnama

Sadashiv Lokhande : राजकीय कुंडलीत राजयोग असेल, तर सत्तेच्या सारीपाटावर लागोपाठ अनुकूल दान पडते, याची प्रचिती शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांच्या वाटचालीकडे पाहिले की येते. एकीकडे भाजपने शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीची संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच वेळी लोखंडे यांनी आपली वाट बदलली. त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली, तर या मतदारसंघाची जबाबदारी असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपची संघटनात्मक बांधणी, अशा डबल इंजिनचा लाभ त्यांना होऊ शकतो.

Sadashiv Lokhande
खासदार लोखंडे यांचा एकदा नव्हे तर चौथ्यांदा नवा घरोबा!

भाजपने सर्वेक्षण करून त्यांच्याकडे नसलेले, मात्र जेथे विजय मिळू शकतो, असे राज्यातील सोळा लोकसभा मतदारसंघ निश्चित केले. त्यांत शिर्डीचा समावेश आहे. येथे भाजपने संघटनात्मक पातळीवर पूर्वतयारी सुरू केली. नाशिक जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल आहेर यांना प्रभारी नियुक्त केले, तर विखे पाटलांकडे मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. संघटनात्मक बांधणीचा आणि वातावरणनिर्मितीचा भाग म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल येत्या शनिवारपासून (ता. 10) येथे तीन दिवसांच्या मुक्कामी येऊन कार्यकर्त्यांना सक्रिय करणार आहेत.

Sadashiv Lokhande
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

शिंदे गटात प्रवेश करून लोखंडे शिर्डीत आले, त्यावेळी भाजपच्या पदाधिका-यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीचा शब्द घेऊनच लोखंडेंनी शिवसेना सोडली, असा तर्क मांडला जात आहे. तथापि, अद्याप त्याबाबत काहीही घोषणा झालेली नाही.

लोखंडे यांची कार्यपद्धती मतदारसंघातील प्रस्थापितांच्या साम्राज्यात जाऊन ढवळाढवळ करायची नाही. त्यांच्यासोबत चुकूनही संघर्ष होऊ द्यायचा नाही, अशी आहे. जुळवून घेणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. त्यांना आता भाजपची उमेदवारी मिळाली तर त्यांच्या दृष्टीने राजकीय सारीपाटावर अनुकूल दान पडले, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com