खासदार महाडिकांनी वाटल्या सोन्याच्या अंगठ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadiksarkarnama

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने (BJP) शनिवारी दिवसभर विविध कार्यक्रमक राबवण्यात आले. कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये 17 सप्टेंबर रोजी दिवसभरात जन्मलेल्या बालकांना भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या हस्ते सोन्याच्या अंगठीचे वाटप करण्यात आले.

शासकीय रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री १२ पासून आज रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठ्या प्रदान करण्यात आल्या. महाडिक यांच्या वतीने जवळपास 20 नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात आली. सीपीआर रुग्णालयाचा प्रसूती विभागात सर्वसामान्य महिलांची प्रसूती होते. त्यांनाही पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मिळावा, या उद्देशाने भाजपने, अंगठी वाटप केल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.

Dhananjay Mahadik
Nitish Kumar : अखिलेश यादवांची नीतिशकुमारांना मोठी ऑफर; यूपीतून उतरणार लोकसभेच्या आखाड्यात?

जवळपास 20 बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात आली. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी जन्माला येणे ही आनंदाची बाब आहे. वाढदिवसानिमित्त या बालकांना टोकन ऑफ लव्ह आमच्याकडून देण्यात येतीय, असे महाडिक यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांचा ७३ वा वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. याअंतर्गत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, दिव्यांगांना साहित्य वाटप तसेच सर्वसामान्यांनाही वस्तू वाटप, असे उपक्रम राबवण्यात आले. कोल्हापुरातही विविध सामाजीक उपक्रम राबवण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या दातृत्त्वाचा वारसा पुढे चालवण्याच्या हेतुने सीपीआरमध्ये अभिनव उपक्रम राबवण्यात आला, असे महाडिक यांनी सांगितले.

Dhananjay Mahadik
Supriya Sule|भाजपला पराभव दिसू लागलाय; सुप्रिया सुळेंनी जखमेवर मीठ चोळलं...

जिल्ह्यातील कष्टकरी काम करणाऱ्या महिलांची प्रसूती छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात होते. शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून आज रात्री १२ वाजेपर्यंत सीपीआरच्या प्रसूतीविभागात जन्मलेल्या बालकांना सोन्याच्या अंगठीचे वाटप करण्यात आले. यावेळी धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोन्याची अंगठी आणि मातांना ब्लॅकेटसूचे वाटप करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in