नवनिर्वाचित खासदार महाडिकांनी महामार्गावरच घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद!

माझ्या विजयाचे खरे शिल्पकार असणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची भेट घेतली.
नवनिर्वाचित खासदार महाडिकांनी महामार्गावरच घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद!
Dhananjay Mahadik-Raju Shettisarkarnama

पुणे : अत्यंत प्रतिष्ठेच्या, अटीतटीच्या राज्यसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणणारे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे आज (ता. १२) कोल्हापुरात पोचले. मुंबईहून कोल्हापूरला जात असताना ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. तसेच, ज्यांनी ज्यांनी निवडणुकीत मतदानरुपी मदत केली, त्यांंना भेटून महाडिक आभारही मानत आहेत. कराड येथे महामार्गावर योगायोगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांची आणि महाडिकांची भेट झाली. त्यावेळी नवनिर्वाचित खासदार महाडिक यांनी शेट्टींना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले, तर शेट्टींनी त्यांचे विजयाबद्दल स्वागत केले. (MP Dhananjay Mahadik took the blessings of Raju Shetti)

Dhananjay Mahadik-Raju Shetti
महाडिकांच्या गुलालाचा खरा धक्का शिवसेनेपेक्षा सतेज पाटलांना बसलाय!

धनंजय महाडिक यांनी भाजपच्या तिकिटावर राज्यसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यासाठी संपूर्ण महाडिक परिवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरला, तसेच स्वतः धनंजय महाडिक यांनी बहुतांश आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाडिकांच्या कष्टाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनाची जोड मिळाली आणि महाडिकांनी अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला.

Dhananjay Mahadik-Raju Shetti
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या गाडीवर कोसळले झाड

विजयानंतर महाडिक हे आज सकाळी आपल्या गावी कोल्हापूरला येत होते. महामार्गावर प्रथम सकाळी त्यांनी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांची भेट घेऊन आभार मानले. दोघांनीही ॲम्ब्युलनसमधून येऊन मतदान केले होते, ते दोघेही दुर्धर आजाराशी लढा देत आहेत. डॉक्टरांनी नकार दिल्यानंतरही त्यांनी मुंबईत येऊन मतदान केले होते. या भेटीबाबत महाडिक यांनी म्हटले आहे की, माझ्या विजयाचे खरे शिल्पकार असणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची भेट घेतली. प्रकृती ठीक नसतानाही पक्षाच्या अस्मितेसाठी समर्पित वृत्ती ठेवून तुम्ही मतदानाचा हक्क बजावलात. माझ्या विजयामध्ये तुमचा मोठा वाटा आहे. आपण कर्तव्यनिष्ठेचे एक आदर्श उदाहरण भारतीय राजकारणाला घालून दिले आहे. अशा शब्दात त्यांचे आभार मानले. त्यांना प्रकृती स्वास्थ्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Dhananjay Mahadik-Raju Shetti
‘...तर महाराष्ट्र काँग्रेस शरद पवारांसोबत असेल’

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची आज कराड महामार्गावर योगायोगाने भेट झाली. त्यावेळी खासदार महाडिकांनी गाडीतून उतर शेट्टी यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. राज्यसभा निवडणुकीत विजयश्री संपादन केल्याबद्दल शेट्टींनी महाडिकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडीत राहूनही शेट्टी हे गोकुळच्या निवडणुकीत महाडिकांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे महाडिक आणि शेट्टी यांचे सलोख्याचे संबंध आहेत, त्यामुळेच महाडिकांनी थेट महामार्गावरच राजू शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in