Phaltan : खासदार झालेत आमदाराचे पीए... खासदार निंबाळकर, आमदार गोरेंवर रामराजे बरसले

Ramraje Naik Nimbalkar फलटण येथील वाठार निंबाळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता.
Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Ramraje Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

Satara News : या आधी चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर, आम्ही एकमेकांवर थेट बोलत होतो. पण, सध्याचे खासदार भांडायला तिसराच माणूस घेऊन येतात. तो मला बोलतो आणि खासदार गप्प बसतात. त्यामुळे खासदार आमदाराचे पी. ए. झाले असून त्यांचं काय राजकारण सुरू आहे, हे मला कळत नाही, अशी टीका माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar व आमदार गोरे Jaykumar Gore यांच्यावर केली.

फलटण येथील वाठार निबळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्याला या परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते. मेळाव्यात बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

रामराजे म्हणाले, वास्तविक पाहता एका खासदाराच्या पोटात सहा आमदार असतात. परंतु फलटण तालुक्यातील उलटच झाले आहे. तांत्रिक बाबींवर त्यांची आणि माझी कधी ही चर्चा होऊ देत. पण, त्यांचं राजकारणच मला कळत नाही. या आधी चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर व आम्ही थेट एकमेकांना बोलत होतो.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Ramraje Naik Nimbalkar
Phaltan News: निरा देवघरचे पाणी व्हाया धोम बलकवडी येणार; रणजितसिंह निंबाळकरांचा करिष्मा

पण सध्याचे खासदार भांडायला तिसराच माणूस घेऊन येतात. तो मला बोलतो आणि खासदार गप्प बसतात. खासदारच आमदाराचे पी ए झालेत. त्यांचं काय राजकारण सुरू आहे, हे मला कळत नाही, अशी टीका रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केली आहे.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore, Ramraje Naik Nimbalkar
Phaltan : भांडायच्यावेळी तुटेपर्यंत भांडू; पण, विकासासाठी एकत्र राहू...रामराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com