Amol Kolhe Injured: खासदार कोल्हे यांना'शिवपुत्र संभाजी' महानाट्यावेळी दुखापत; जखमी अवस्थेत प्रयोग केला पूर्ण...

Shivputra Sambhaji Mahanatya: ...म्हणून कराडमधील आजचा प्रयोग दुखापत झाली असली तरी पूर्ण करणार
Amol kolhe News
Amol kolhe NewsSarkarnama

Karad News: अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)चे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कराड येथील शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी दुखापत झाली आहे. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगावेळी घोड्यावरील एन्ट्रीवेळी ही घटना घडली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं माहिती देण्याचत आली आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

शिवपुत्र संभाजी(Shivputra Sambhaji Drama) या महानाट्याचे प्रयोग कराडमधील कल्याणी मैदानावर 28 एप्रिलपासून सुरू आहेत. रविवारी सुरु असलेल्या प्रयोगादरम्यान डॉ. कोल्हे यांना घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली. पाठीत कळ आल्यानं त्यांना तात्काळ घोड्यावरून उतरवण्यात आले. मात्र,तरीदेखील डॉ. कोल्हे यांनी दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीनं प्रयोग पूर्ण केला.

Amol kolhe News
NCP vs Shivsena and BJP : जयंत पाटलांच्या दाव्यातील भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी हवाच काढली; म्हणाले...

खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांना दुखापत झाली असली तरी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आयोजित ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील आजचा प्रयोग दुखापत झाली असली तरी पूर्ण करणार असल्याचं कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या नाट्याचे उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Amol kolhe News
Amalner Bazar Samiti Election : अमळनेरमध्ये सत्तांतर ; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांकडून तीन माजी आमदारांना धोबीपछाड

कराड येथील प्रयोगावेळी झालेल्या दुखापतीमुळे खासदार कोल्हे यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे.तसेच पाठीतून तीव्र कळा येत आहेत. त्यामुळे आजचा प्रयोग पूर्ण झाल्यावर मुंबईत जाऊन उपचार घेणार आहे असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली आहे. तसेच पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर 11 ते 16 मे कालावधीत होणारे ‘शिवपुत्र संभाजी’महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील असंही कोल्हे म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in