Amol Kolhe
Amol KolheSarkarnama

Amol Kolhe News: शरद पवारांच्या सभेला दुसऱ्यांदा दांडी ? अमोल कोल्हेंच्या मनात नक्की चाललंय काय ?

Sharad Pawar Rally: बीड नंतर दुसऱ्या सभेलाही कोल्हे गैरहजर राहणार आहेत.

NCP Rally In Kolhapur: शरद पवारांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्याचे आश्वासन येवल्याच्या सभेत खासदार अमोल कोल्हेंनी दिले होते. मात्र, त्यानंतर अमोल कोल्हे शरद पवारांसोबत कुठल्याही सभांमध्ये दिसून आलेले नाहीत. त्यामुळे अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय तरी काय ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची जाहीर सभा काही दिवसापूर्वी बीडमध्ये झाली. या सभेला कोल्हे येणार होते, पण ते गैरहजर राहिले, त्यानंतर आज (शुक्रवारी) पवारांची कोल्हापुरात सभा होत आहे. या सभेलाही कोल्हे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. प्रकृती बरी नसल्याने कोल्हे आजच्या सभेला जाणार नाहीत, असे समजते. बीड नंतर दुसऱ्या सभेलाही कोल्हे गैरहजर राहणार आहेत.

Amol Kolhe
Sharad Pawar News : 'अजितदादा आमचेच नेते..' ; शरद पवारांच्या विधानावर सर्वपक्षीय नेत्यांना काय वाटतं ? ; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम...

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टारप्रचार अशी जबाबदारी असलेले कोल्हे सध्या शरद पवारांच्या सभांना गैरहजर का राहतात, असा प्रश्न विचारला जात आहे. येवल्यातली सभा कोल्हेंनी गाजवली होती. त्यानंतर ते सभेत दिसले नाहीत, त्यामुळे कोल्हे पवारांच्या सभांना गैरहजर का राहतात, अशा चर्चांना उधाण आले आहे.

Amol Kolhe
Bawankule On Sanjay Raut: ठाकरेंचे भरकटलेले 'यान' काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल; बावनकुळेंचा राऊतांना चिमटा

पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने बीड येथील सभेला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कारण अमोल कोल्हेंनी दिले होते. आज (ता. २५) कोल्हापुरात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात बॅनरबाजी केली आहे.

"बाप हा बापच असतो," आणि "योद्धा पुन्हा मैदानात" असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकले आहेत. प्रत्येक चौकात हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरबाजीने नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

ऐतिहासिक दसरा चौकातून शरद पवार कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज हे असणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in