माईंनी अनाथांसाठी आयुष्यभर कष्ट घेतलं : उदयनराजे

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या Social Worker सिंधुताई सपकाळ Shindhutai Sapkal यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.
Udayanraje Bhosale Reaction After Sindhutai Sapkal Death

Udayanraje Bhosale Reaction After Sindhutai Sapkal Death

twitter

सातारा : सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आजपर्यंत अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतलं. अतिशय खडतर असं आयुष्य त्या जगल्या. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक आदर करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी भावनिक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. (Udayanraje Bhosale Reaction After Sindhutai Sapkal Death)

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती, अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे. माईंच्या या निधनाबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी दु:ख व्यक्त केलंय.

<div class="paragraphs"><p>Udayanraje Bhosale Reaction After Sindhutai Sapkal Death</p></div>
..अखेर भाजीपाल्याची गाडी सिंधुताई सपकाळ यांच्या बालसदनात पोचली!

उदयनराजे म्हणाले, 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आजपर्यंत अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतलं. अतिशय खडतर असं आयुष्य त्या जगल्या. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक आदर करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं दु:ख व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in