अबब! विशाल फटेच्या खात्यावरून तब्बल 100 कोटी रुपयांचे व्यवहार

बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या फसवणुकीच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Vishal Phate Scam News
Vishal Phate Scam News Sarkarnama

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या बँक खात्यांवरून तब्बल 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हे व्यवहार 2019 पासून आतापर्यंत म्हणजेच सुमारे तीन वर्षांत झाले आहेत. त्याने 800 ते 900 गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट सुरू असून, त्यानंतर फसवणुकीचा नेमका आकडा समोर येईल, अशी माहिती पोलीस (Police) सूत्रांनी दिली. (Vishal Phate News Updates)

गुंतवणूकदारांच्याच पैशातून फटेने 45 लाखांची चारचाकी घेतली. याचबरोबर त्याने बार्शीत तब्बल तीन-तीन कोटी रुपयांची दोन घरे बांधली. दरम्यान, गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावत त्याचे ऑफिस गाठण्यास सुरवात केली होती. गुंतवणूकदारांचे पैसे घालवल्याने आणि परत देण्यासाठी पैसे नसल्याने तो पसार झाला होता. त्यानंतर तो स्वत:हून पोलिसांसमोर शरण आला होता. पोलिसांनी फटेचे संगणक जप्त केले असून, लॅपटॉप व मोबाईल तपासणीसाठी पुण्यातील फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. फटेच्या व्यवहारांचे लेखापरीक्षण सुरू असून चार्टर्ड अकांउंटकडून याबाबत पोलिसांनी लवकरच अहवाल मिळणार आहे. सध्या समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार फटेच्या विविध बँक खात्यांतून तीन वर्षांत 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. याचबरोबर त्याने 800 ते 900 गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. (Barshi Scam)

Vishal Phate Scam News
काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्यांचा पक्षाला रामराम

शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष विशाल फटेने गुंतवणूकदारांना दाखविले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास बसेपर्यंत सुरवातीला तो सुरवातीला पैसे परत करत होता. तो एकाकडून घेतलेले पैसे दुसऱ्या गुंतवणूकदाराला देत असे. या पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक न करताही पैसे फिरवत होता. नंतर गुंतवणूकदार वाढल्यानंतर हे त्याच्यासाठी अशक्य झाले. अखेर तो सगळे सोडून फरार झाला होता. फटेच्या विरोधात तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, फसवणुकीचा आकडाही वाढत आहे. त्याने हे पैसे नेमके कुठे घालवले याचा शोध पोलीस घेत आहेत. (Vishal Phate News)

Vishal Phate Scam News
खनिज तेल @100 डॉलर! पेट्रोल, डिझेल दरवाढीचा लवकरच उडणार भडका

विशाल फटेचे मंगळवेढ्यात जुने घर असून, त्याच्या वडिलांच्या नावावर पाच ते सहा एकर शेतजमीन आहे. पोलिसांनी बार्शीचे मुख्याध्याधिकारी व तहसिलदारांना पत्र देऊन फटे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावरील मालमत्तांची माहिती मागविली आहे. त्याच्या भावाने सुमारे 15 तोळे सोने स्वत:हून पोलिसांकडे जमा केले आहे. फटे आणि कुटुंबीयांच्या संपूर्ण मालमत्तांचे मूल्यांकन झाल्यावर गुंतवणूकदारांची यादी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर केली जाणार आहे. यानंतर ही मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. (Vishal Phate Barshi Scam News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com