मोनिका राजळे म्हणाल्या, निधी आणतो आम्ही आणि ते पाठ थोपटून घेतात...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakne ) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
Monica Rajale Vs Pratap Dhakne
Monica Rajale Vs Pratap DhakneSarkarnama

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसह पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे भाजपच्या आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakne ) यांच्यात आरोप प्रत्यारोपामुळे राजकारण तापले आहे. Monica Rajale said, we bring funds and they take credit ...

दुलेचांदगाव येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेंतर्गत बांधलेल्या 18 लाख रुपये खर्चाच्या ग्रामसंसद भवनाच्या लोकार्पण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या वेळी गोकुळ दौंड, मनीषा वायकर, विष्णुपंत अकोलकर, काका शिंदे, अर्चना शेळके, रणजित बांगर आदी उपस्थित होते.

Monica Rajale Vs Pratap Dhakne
राजेंद्र फाळके म्हणाले, प्रताप ढाकणे षटकार मारणार...

मोनिका राजळे म्हणाल्या, पाठपुरावा करून आपण विविध योजनांसाठी निधी आणतो. मात्र, निधी प्राप्त झाल्याचे समजताच आपले विरोधक, ‘राज्यात महाआघाडी सरकार आहे. हा निधी आम्ही आणला,’ असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याची टीका आमदार मोनिका राजळे यांनी प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून केली.

राजळे म्हणाल्या, की अतिवृष्टीत अनेक गावांतील बंधारे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. मात्र, या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी आणण्याचे काम आपण करीत आहोत. पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी तालुक्याला जलयुक्त शिवार योजनेसाठी मोठा निधी देऊन ठाकरे सचिवालय योजना आणली. या योजनेमुळे आता प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची चांगली इमारत उभी राहणार आहे.

Monica Rajale Vs Pratap Dhakne
मोनिका राजळे म्हणाल्या, सध्या काहींना निवडणुका जवळ आल्याने डोहाळे लागलेत...

अतिवृष्टीमुळे ज्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले, त्याचे पंचनामे आपण करून घेतले. लवकरच बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळणार आहे. गेली पाच वर्षे तुमच्या विश्वासाला पात्र राहीन अशा पद्धतीने आपण काम केले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत, त्यात विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही राजळे यांनी केले.

ॲड. हरिहर गर्जे यांनी प्रास्तविक केले. चंद्रकांत पाचरणे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com