मोदींची बुलडोजर नीती देशाच्या एकात्मतेला घातक...वृंदा करात

वृंदा कारत Vrinda Karat म्हणाल्या, भाजपने BJP व्यक्तिपूजेचे अवडंबर माजवत देशात country वाढलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेकडे Social and economic inequality पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
मोदींची बुलडोजर नीती देशाच्या एकात्मतेला घातक...वृंदा करात
Vrinda Karatsarkarnama

सातारा : महागाई ,पेट्रोल, डिझेल दरवाढ व इतर जीवनावश्यक सुविधांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाकडे लक्ष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक व्यवस्था उध्वस्त करणारी बुलडोजर नीती देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला अतिशय धोकादायक आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरो सदस्या व माजी खासदार वृंदा करात यांनी केली आहे.

जनवादी महिला संघटनेच्या साताऱ्यात राज्यस्तरीय अधिवेशननिमित्त त्या साताऱ्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माकपच्या जनरल सेक्रेटरी मरियम बुट्वाला, राज्य सरचिटणीस आनंदी अवघडे उपस्थित होत्या.

Vrinda Karat
`माकप` नेत्याच्या उपस्थितीतच सदस्यांचा `राष्ट्रवादी`त प्रवेश सोहळा

वृंदा करात म्हणाल्या, भाजपने व्यक्तिपूजेचे अवडंबर माजवत देशात वाढलेल्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गेल्या आठ वर्षात भांडवलशाही अर्थव्यवस्था प्रबळ झाली असून देशातील 61 टक्के जनतेचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांच्या आतच राहिले आहे. तब्बल सहा कोटी तरुणांना रोजगार गमवावा लागला आहे.

Vrinda Karat
Rajyasabha Election: महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांना भेटणार

पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दरही गगनाला भिडले आहेत. तरीसुद्धा प्रत्येक प्रार्थना स्थळाच्या मागे शिवपिंड शोधण्याचा भाजपचा उद्योग म्हणजे देशांमध्ये व शांतता आणि धार्मिक ध्रुवीकरण आचा घातक पायंडा निर्माण केला जात आहे. मोदींचीही सामाजिक व्यवस्था उद्धवस्त करण्याची बुलडोजर नीती असून त्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत चालली आहे.

Vrinda Karat
भाजपशासित मध्य प्रदेशात दारु स्वस्त! करात कपातीचा मोठा निर्णय

करात म्हणाल्या, जातीय जनगणना मोदी सरकारकडून केली जात नाही. त्यामुळे सामाजिक समतेची दरी वेगवेगळ्या स्तरांच्या माध्यमातून किती रुंदावली आहे, याची घातक सत्य जनतेसमोर येऊ नये म्हणून वेगवेगळे चुकीच्या अजेंडे जाणीवपूर्वक राबवले जात आहेत. आरएसएस आणि भाजप यांनी सुरू केलेले राजकीय आणि धार्मिक ध्रुवीकरण आजचे हे उद्योग देशाला अर्थव्यवस्थेच्या आणि सामाजिक राजकीय रचनेच्या दृष्टीने धोक्यात आणणारे आहेत.

Vrinda Karat
आर्थिक व्यवस्था संकटात, हे तर पाकीटमार सरकार - वृंदा करात

या घातक परंपरेला रोखण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज उठवून हिंमतीने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. ईडी आणि सीबीआय यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात आहेत. या स्वायत्त यंत्रणेची स्वायत्तता आत्ताच चुकीच्या धोरणामुळे गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. मोदींचे प्रशासन म्हणजे धोरणांची राजकीय दिवाळखोरी असल्याची टीका वृंदा करात यांनी केली.

Vrinda Karat
मी पंतप्रधान नाहीच, केवळ १३० कोटी जनतेचा प्रधानसेवक : नरेंद्र मोदी

श्रमजिवी महिलांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार...

माकपच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम बूटवाला म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये रेशनिंग व्यवस्था मोडकळीस आणण्याचा महाविकास आघाडीचा डाव असून सर्वसामान्यांना दोन वेळचे अन्नही मिळेनासे झाले आहे. दारिद्र रेषेखालील यादीमध्ये भलत्याच लोकांची नावे असून यामुळे अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच श्रमजीवी महिला वर्ग संकटात सापडला आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत देशभरातून आणि राज्यातूनही ३० लाख श्रमजीवी महिलांचे सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार असून त्यातून आंदोलन उभे राहणार आहे . साताऱ्यातही श्रमजीवी महिलांचे संघटन उभे करून मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे राज्य सरचिटणीस आनंदी अवघडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in