अन्नदात्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हटल्याबद्दल मोदींनी माफी मागावी...

मोदी सरकारने तीनही कृषी कायदे आज मागे घेतले आहेत. यावरून पुन्हा एकदा मोदी Narendra Modi सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे.
अन्नदात्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हटल्याबद्दल मोदींनी माफी मागावी...
Prithviraj Chavan, Narendra Modisarkarnama

सातारा : पंजाब व उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमुळेच केंद्र सरकारने काळे कृषी कायदे मागे घेतले आहेत. हा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक विजय आहे. आता अन्नदात्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हटल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

मोदी सरकारने तीनही कृषी कायदे आज मागे घेतले आहेत. यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. हा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. याविषयी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पेजवरून मोदींनी आता शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Prithviraj Chavan, Narendra Modi
'मोदींना शेतकऱ्यांचा कळवळा नव्हे तर निवडणूकांमुळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय'

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, काळे कृषी कायदे मागे घेणे हा शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक विजय आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमुळेच हा निर्णय घेतला आहे. पण, या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्यात आले याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी माफी मागावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in