नगर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

राज्यातील 208 नगरपालिकांतील सदस्यांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत संपत आहे.
Ahmednagar
AhmednagarSarkarnama

अहमदनगर - राज्यातील 208 नगरपालिकांतील सदस्यांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आज ( मंगळवारी ) या नगरपालिकांचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. ( Model ward formation program of nine municipalities in Nagar district announced )

अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायती व नऊ नगर पालिकांची मुदत संपत आली होती. त्यातील चार नगर पंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद झाली असल्याने त्यांची निवडणूक लवकरच होणार आहे. अशा स्थितीत आज राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे.

Ahmednagar
Rajale vs Dhakne: पाथर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी राजळे-ढाकणेंची मोर्चे बांधणी सुरू

या नऊ पालिकांत कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहाता, राहुरी व देवळाली प्रवरा यांचा समावेश आहे. यातील कोपरगाव, पाथर्डी, राहाता व देवळाली प्रवरा या चार नगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे. तर उर्वरित नगरपालिकांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. संगमनेर नगरपालिका काँग्रेसच्या, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव व राहुरी या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

Ahmednagar
आशुतोष काळे म्हणाले, नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागा

या निवडणुकांवर ठरणार विधानपरिषदेचा आमदार

अहमदनगर जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या जागेवरील आमदार अरूण जगताप यांच्या जागेसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. या जागेवर आमदारपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा या नऊ नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालावर लागल्या आहेत. त्यामुळे भाजप व महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न या नगरपालिका निवडणुकीत करणार आहे.

प्रभाग रचना कार्यक्रम

2 मार्च पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक यांच्याकडे सादर करण्यात येईल. 7 मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल. 10 मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाश्यांच्या माहितीसाठी न हरकती तसेच सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येईल. 10 ते 17 मार्च या कालावधीत हरकती मागविण्यात येतील. 22 मार्चला हरकतींवर सुनावणी होईल. 25 मार्चपर्यंत हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येईल. 1 एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com