अहमदनगरचे नाव बदलण्याचा मनसेचा घाट

औरंगाबाद पाठोपाठ अहमदनगर शहराचे नावही बदलण्याचा घाट घातला जात आहे.
अहमदनगरचे नाव बदलण्याचा मनसेचा घाट
AhmednagarSarkarnama

अहमदनगर - औरंगाबाद पाठोपाठ अहमदनगर शहराचे नावही बदलण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या हनुमान चालिसा पठण स्पर्धेच्या कार्यक्रम पत्रिकेवर अहमदनगरचे नाव अंबिकानगर असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ( MNS's attempt to change the name of Ahmednagar )

देशातील फार थोडी शहरे आहेत. ज्याचा स्थापना दिवस माहिती असतो. त्यात अहमदनगर शहराचा समावेश आहे. 28 मे 1490 मध्ये या शहराची स्थापना अहमद निजाम शहा यांनी केली. त्यापूर्वी अहमद निजामशहा यांच्या राजधानीचे शहर हे जुने नगर ( जुन्नर ) होते. नवीन शहर स्थापन केल्यावर त्या नगरला अहमदशहाच्या नावावरून अहमदनगर असे म्हणू लागले. विविध शासकीय कागद पत्रांतही हेच नाव आहे. मात्र पूर्वी शिवसेना व आता मनसे अहमदनगरच्या जागी अंबिकानगर असा उल्लेख करत आहे.

Ahmednagar
बाळा नांदगावकर म्हणाले, पक्ष शिस्त व विश्वासार्हतेत तडजोड नाही...

अहमदनगर शहराचा 532 वा स्थापना दिवस नुकताच मोठ्या उत्साहात शहरात साजरा करण्यात आला. यातच काल मनविसे तर्फे हनुमान चालिसा स्पर्धेचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. यात अहमदनगर ऐवजी अंबिकानगर असा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरचे उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मनविसेने 28 मे 2021 ला अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात अंबिकानगरचा फलक लावला होता. तर यंदाच्या शहर स्थापना दिनाच्यावेळी पोस्टरवर अंबिकानगर उल्लेख केला आहे. त्यामुळे अहमदनगर शहराच्या नामांतराचा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत. राज्यातील तीन शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. यात औरंगाबादचे संभाजीनगर, अहमदनगरचे अंबिकानगर तर उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा घाट घातला जात आहे.

Ahmednagar
बाळासाहेब थोरात म्हणाले, विरोधकांचा छळ करणे हे भाजपचे धोरण...

मनविसेचे जिल्हा अध्यक्ष सुमित वर्मा यांनी या संदर्भात सांगितले की, मनविसेतर्फे 7 जूनला अंबिकानगर येथे हनुमान चालिसा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 28 मे रोजी काही जण शहर स्थापना दिवस साजरा करतात मात्र याला विरोध म्हणून आम्ही पोस्टरवर अंबिकानगर लिहिले आहे. या शहराचे खरे नाव अंबिकानगर आहे. या नावाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.

Ahmednagar
रोहित पवारांचे पडळकरांना सडेतोड उत्तर : म्हणाले...

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, ज्यांच्याकडे जनतेला देण्यासारखे काही नाही. ते मानसिक विभाजन करून नसलेले मुद्दे काढून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशातील नागरिक महागाईने होरपळतो आहे. केंद्रातील भाजपचे सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे हे झाले आहे. या बाबत तरूणांना जाग आणून त्यांच्या रोजगारीचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत. हे विषय मनसेकडे नाहीत. मला हे सर्वांबाबत बोलायचे आहे. आपण सत्तेत येण्यापूर्वी बेराजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार असे मुद्दे घेतो आणि सत्तेत आल्यावर विभाजनाचे मुद्दे बाहेर काढतो. या सोप्या मार्गावरून मनसे जात आहे. यातून देशाचे व लोकांचे काय भले होणार आहे. यातून बेरोजगारी, महागाईचा प्रश्न सुटणार आहे का, असा प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in