नगर जिल्हा परिषदेसाठी मनसेची तयारी सुरू : संगमनेरमध्ये झाली बैठक

अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समितीसाठी नुकतेच प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले.
Ahmednagar MNS
Ahmednagar MNSSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समितीसाठी नुकतेच प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे विविध पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही ( MNS ) समावेश आहे मनसेने संगमनेर येथे आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ( MNS preparations for Ahmednagar Zilla Parishad started: Meeting held in Sangamner )

संगमनेर पाठोपाठ जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही लवकरच बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. मनेसे जिल्हाध्यक्षांनी तालुका प्रमुखांकडून अहवाल मागविले आहेत. त्यानंतर बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. पाथर्डी तालुक्यातील भालगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्याची तयारी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांनी केली आहे.

Ahmednagar MNS
`मनसे पॅटर्न`ने केला शिवसेनेचा घात?

संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मनसेची बैठक जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली. त्यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे यांनी सांगितले की मनसे येत्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरणार आहे. तालुक्यातील सर्व गटात गणात आणि नगरपालिकेत सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित करण्यासाठी व पक्षाचे चिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी यावेळी जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व जण गट तट विसरुन कामाला लागतील असा विश्वास गोर्डे त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत पक्ष सर्वतोपरी सहकार्य करणार असून पक्षातील वरिष्ठ नेते निवडणूक प्रचारासाठी गट वार फिरणार आहेत. भाजप-मनसे युती संदर्भात अजून सूचना आलेल्या नाही. त्यासंदर्भात योग्य वेळी निर्णय होईल. तोपर्यंत आपली पूर्ण तयारी हवी. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Ahmednagar MNS
राज ठाकरे भाजप-मनसे युतीचा निर्णय सोमवारी नाशिकमध्ये घेणार?

याप्रसंगी काही कार्यकर्ते हे पदावर नसतांना त्यांच्या नावासमोर पदे लावत आहेत त्यांनी माजी असा उल्लेख करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. पक्षात अधिकृतपणे संपर्क प्रमुख बाळा नांदगावकर यांच्या सुचनेने संगमनेर तालुका उपजिल्हाध्यक्ष शरद गोर्डे, तालुका अध्यक्ष अशोक शिंदे व शहर अध्यक्ष तुषार ठाकुर हेच अधिकृत पदाधिकारी आहे आणि हे ज्या पदाधिकाऱ्यांची निवड करतील. तेच अधिकृत असल्याचे बाबासाहेब शिंदे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद गटानुसार निवडणूक जबाबदारी विभागून देण्यात आली.

अशोक शिंदे, तुषार ठाकुर यांनी यावेळी विचार मांडले. तालुका सरचिटणीस दीपक वर्पे यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीला रामा शिंदे, आकाश भोसले, महेश उदमले, संतोष गिते, तुषार बढे, अभिजित घाडगे, संग्राम हासे यांसह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahmednagar MNS
इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

जिल्हा परिषद गट निहाय जबाबदाऱ्या

जोर्वे गट - प्रमुख शरद गोर्डे, संगमनेर खुर्द गट - रामा शिंदे, धांदरफळ गट - दीपक वर्पे, घुलेवाडी गट - प्रशांत दातीर, बोटा गट - सतीश फापाळे, समनापूर गट - संदीप नवले, अश्वी गट - तुषार बढे, साकुर गट - अशोक शिंदे, चंदनापुरी गट - संदीप गाडेकर, तळेगाव गट - संदीप रनमळे या महत्वाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in