मनसेने बैठक घेऊन केला पोलिसांचा निषेध

संगमनेर येथील पोलिसांनी काल (सोमवारी) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
MNS
MNS Sarkarnama

अहमदनगर - राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मशिदीवरील भोंग्यांवरून आंदोलन उभे करणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील पोलिसांनी काल (सोमवारी) प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. न्यायालयाच्या आदेशाने या कार्यकर्त्यांना सोडून द्यावे लागले. संगमनेरमध्ये मनसेने आज पदाधिकारी व कार्यकऱ्यांची बैठक घेऊन पोलिस प्रशासनाचा निषेध केला आहे. ( MNS held a meeting and protested against the police )

संगमनेर येथे आज (ता. 3 ) मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक जिल्हा उपअध्यक्ष शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीमध्ये संगमनेर शहर पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा निषेध करण्यात आला. काही कारण नसताना मनसे पदाधिकारी यांना चहा पाणीसाठी बोलावून चर्चा करण्याचा बनाव करीत अचानक संगमनेरमध्ये असलेल्या स्ट्राईक फोर्सला बोलावून कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अटक दाखविण्यात आली. तसेच पोलिस गाडीतून मेडिकल करून थेट न्यायालयात नेले.

MNS
मनसेचे लोक ताब्यात घेतले अनं न्यायालयाच्या आदेशाने सोडून दिले

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हंटले आहे की, सर्वांचे मोबाईल ही पोलिसांनी बळजबरीने काढून घेतले. यावेळी पदाधिकारी यांना आपले मत मांडण्याचे किंवा काय कारवाई केली जाते याची माहिती देखील देण्यात आली नाही. कार्यकर्त्यांना गाफील ठेवण्यात आले. योगायोगाने संगमनेरचे प्रतिथयश अॅड. श्रीराम गणपुले यांनी न्यायालयासमोर पायऱ्या उतरत असताना कार्यकर्त्यांना बघितले व क्षणाचाही विलंब न करता वकीलपत्र घेऊन मनसे पदाधिकारी यांची बाजू खंबीरपणे न्यायालयात मांडली.

पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी धोकेबाजी करून केलेली कारवाई न्यायालयाने रद्द केली. मनसे पदाधिकाऱ्यांनी 9 एप्रिलचे निवेदन न्यायालयासमोर दाखवून मनसे पदाधिकारी हे निवेदन देण्यासाठी आले होते. हे खोटे सांगून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न देशमुख यांनी केला. मनसे पदाधिकारी यांनी कुठल्याही गैरकृत्य केले नसल्याचे अॅड. श्रीराम गणपुले यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देवून मनसे पदाधिकारी यांची सुटका करून घेतली. या बैठकीमध्ये अॅड. श्रीराम गणपुले यांचा आभाराचा ठराव पारित करण्यात आला.

MNS
दुर्गा तांबे म्हणाल्या, आम्हाला निवडणुकांत रणधुमाळी करावी लागत नाही...

या विषयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतली आहे. पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती याठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे यांनी दिली. संगमनेरमध्ये कुठल्याही प्रकारचे आज मितीला हिंदू-मुस्लीम वाद नसल्याचे दिसत आहे.

MNS
दुर्गा तांबे म्हणाल्या, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये चांगले काम होतय...

जिल्ह्यात कुठेही मनसे पदाधिकारी यांच्यावर कारवाई झाली नसून संगमनेरमध्येच का पोलिस निरीक्षक देशमुख मनसे पदाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे कारण काय? या विषयाला जाणून बुजून कोणी खतपाणी घालत आहे का व मनसे पक्ष संगमनेरमध्ये वाढू नये यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत का, अशी शंका शरद गोर्डे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली. मात्र आता पक्ष प्रमुख राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे संगमनेरमध्ये पक्षाचे काम जोरावर चालणार असल्याचेही या ठिकाणी नमूद करण्यात आले व प्रस्थापिताच्या दडपशाहीला भीक घालणार नसल्याचे शरद गोर्डे यांनी सांगितले.

या बैठक प्रसंगी तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, तालुका सरचिटणीस दीपक वर्पे, रामा शिंदे, तालुका उपअध्यक्ष प्रशांत दातीर, संदीप गाडेकर, यांच्यासह बैठकीला बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in