Sharad Pawar on MLA Disqualification: शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार? शरद पवारांनी दिले उत्तर

Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Sharad Pawar on MLA Disqualification
Sharad Pawar on MLA Disqualification

Sharad Pawar Comments MLA Disqualification : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल या महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे. जसजसा निकालाचे दिवस जवळ येत आहे तसतसे निकालसंदर्भात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार पात्र ठरणार की अपात्र, सरकार पडणार की राहणार असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळासोबतच राज्यातील जनतेलाही पडले आहे. (MLAs of Shinde group will be disqualified? Sharad Pawar gave the answer)

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होऊन जवळपास महिना उलटून गेला. त्यामुळे आता निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संत्तासंघर्षाच्या निकालासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ही भविष्यवाणी केली आहे.

Sharad Pawar on MLA Disqualification
Mla Rajesh Tope In marriage ceremony : टोपेंची दिवसभरात अकरा लग्न समारंभात हजेरी, पंगतीही वाढू लागले..

या दौऱ्यात त्यांना सत्तासंघर्षाच्या निकाल कधी लागणार, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागू शकतो. त्यानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर, 'ते सांगता येणार नाही, निकाल आल्यावरच कळेल,' असं उत्तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं.

सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. घटनापीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला. आता या निकाल कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. घटनापीठातील ज्या पाच न्यायाधिशांसमोर ही सुनावणी झाली, त्यातील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे येत्या १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात म्हणजे १४ मेच्या आधी हा निकाल लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political Crisis)

Sharad Pawar on MLA Disqualification
Ujwal Nikam on Supreme Court Judgment: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे भाष्य

सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या दिवशी ज्या प्रकरणाचा निकाल दिला जाणार असतो ते आदल्या दिवशी जाहीर केले जाते. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीखही एक दिवस आधीच जाहीर होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com