आमदार विनय कोरे विजयी; शाहूवाडी, आजऱ्यात विद्यमान संचालकांना दणका

प्रक्रिया गटातून विरोधी गटाचे खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर विजयी झाले आहेत.
Vinay Kore won Kolhapur District Bank Election

Vinay Kore won Kolhapur District Bank Election

Sarkarnama

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (KDCC Bank Election) पन्हाळा सेवा संस्था गटातून आमदार विनय कोरे (Vinay Kore) विजयी झाले आहेत. त्यांना 243 पैकी 204 मते मिळाली. तर शाहूवाडी व आजरा येथे दोन विद्यमान संचालकांना पराभवाचा सामना करावा लागल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला आहे. (Vinay Kore won Kolhapur District Bank Election)

जिल्हा बँकेची मतमोजणी आज महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता सुरू झाली. प्रक्रिया गटातून विरोधी गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik), बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विकास संस्था गटात गडहिंग्लज तालुक्यातून विद्यमान संचालक संतोष पाटील, भुदरगडमधून विद्ममान संचालक व माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील, आजरातून सुधीर देसाई, शाहुवाडीतून रणवीरसिंह गायकवाड या सत्तारूढ गटाचे चार उमेदवार विजयी झाले. शाहुवाडीतून विद्ममान संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर तर आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

<div class="paragraphs"><p>Vinay Kore won Kolhapur District Bank Election</p></div>
सतारुढ गटाला दणका देत खासदार मंडलिकांनी उधळला गुलाल

सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil yadravkar) आणि गणपतराव पाटील यांच्यात होती. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेंद्र यड्रावकर यांना 98 मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना 52 मते पडली.

भुदरगड विकास संस्था गटात रणजित पाटील यांना 144 तर त्यांचे विरोधक यशवंत नांदेकर यांना 62 मते मिळाली. शाहुवाडी विकास संस्था गटात रणवीर गायकवाड यांना 66 तर संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना 32 मते मिळाली. गडहिंग्लज विकास संस्था गटात 106 पैकी तब्बल 100 मते घेऊन संचालक संतोष पाटील यांनी सलग दुसऱ्यांना या तालुक्यातून जिल्हा बँकेत प्रवेश केला. यातील सुधीर देसाई, रणवीर गायकवाड हे पहिल्यांदाच बँकेत आले आहेत. देसाई यांचे वडील दिवंगत राजाराम देसाई यांनी बँकेचे अध्यक्ष पद भूषवले होते.

बॅंकेच्या शिरोळ संस्था गटातून उमेदवार असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मतदान झाल्यानंतर लगेच विजयी जल्लोष केला होता. तसेच, त्यांच्या विजयाचे डिजिटल फलकही झळकले होते. यड्रावकर यांच्याविरोधात गणपतराव पाटील यांनीही तेवढ्याच ताकदीने प्रचार करुन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. शिवाय त्यांच्या पाठीशी आपली ताकद लावून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com