उदयनराजेंच्या दमदाटी, खंडणीमुळे एमआयडीसीची वाढ खुंटली : शिवेंद्रराजेंचा पलटवार

खासदार उदयनराजेंनी 'पंडित'च्‍या जागा संगनमताने शिवेंद्रसिंहराजेंनी कमी किमतीत घेतल्‍याचा आरोप केला होता.
ShivendraSinh Raje Bhosale, Udayan Raje Bhosale
ShivendraSinh Raje Bhosale, Udayan Raje Bhosalesarkarnama

सातारा : सातारा एमआयडीसीवरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) आणि भाजपचे (BJP) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendraSinh Raje Bhosale) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. सातारा औद्योगिक वसाहतीतील पंडित ऑटोमोटिव्‍हच्‍या जागेची चौकशी लावणार असल्याचा इशारा उदयनराजे यांनी दिला होता. त्यावरुन आता शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा एमआयडीसी वाढत नसल्‍याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे असून उद्योजकांना धमकावणे, दमदाटी करणे, वसुल्‍या करायच्‍या आदी कामे ते आणि त्‍यांचे बगलबच्‍चे करत असतात. या व इतर अनेक कारणांमुळे एमआयडीसीऐवजी उद्योजकांनी इतर ठिकाणांना पसंदी दिल्‍याचा आरोप शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. येथील एका कार्यक्रमादरम्‍यान ते बोलत होते. खासदार उदयनराजेंनी 'पंडित'च्‍या जागा संगनमताने शिवेंद्रसिंहराजेंनी कमी किमतीत घेतल्‍याचा आरोप केला होता. त्यावर शिवेंद्रराजे म्‍हणाले, येणाऱ्या प्रत्‍येकाला दमदाटी करायची, संघटना काढायची, आमचीच माणसे घ्‍या म्‍हणून दबाव आणत बघतो, अशी धमकी देणाऱ्यांनी सगळ्या एमआयडीसीची वाट लावली आहे. या कारणांमुळे या ठिकाणी कारखानदार येत नसून आम्‍ही 'पंडित'ची जागा रितसर खरेदी केली आहे.

ShivendraSinh Raje Bhosale, Udayan Raje Bhosale
शिवेंद्रराजेंच्या 'त्या' व्यवहाराची उदयनराजे चौकशी लावणार

त्‍या ठिकाणी आम्‍ही कारखानाच काढणार आहोत. त्‍यातून रोजगारदेखील निर्माण होणार आहे. ही बाब सातारकरांसाठी चांगली ठरणार आहे. बंद पडलेली महाराष्‍ट्र स्कूटर आम्‍ही सुरू करण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत. मात्र, सध्‍या तरी त्‍यात यश येताना दिसून येत नाही. एमआयडीसीची वाढ खुंटण्‍यात, वाट लागण्‍याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे असल्‍याची टीकाही त्‍यांनी पुन्‍हा केली.

उदयनराजे काय म्हणाले होते?

सर्वसामान्य कामगारांवर अन्याय होत असेल तर आम्ही अन्यायाला विरोध करणारच. पंडीत ऑटोमोटिव्हच्या जागेसह सर्वच व्यवहार झालेल्या जागांची न्यायालयीन चौकशी लावणार असून यातून सर्व काही बाहेर येईल. सातारा एमआयडीसीची तसेच गोरगरीब, सर्वसामान्य कामगारांची दुर्दशा कोणामुळे झाली, असा सवाल त्यांनी केला. याची संपूर्ण माहिती सातारा जिल्ह्यातील जनतेला आहे. मुळात सातारची एमआयडीसी स्थापन झाली त्यावेळी आम्ही तीसरीमध्ये होतो. त्यांचा तर जन्मही नव्हता, असा टोला त्यांनी लगावला होता.

तत्कालीन लोकप्रतिनिधी, त्यानंतरचे लोकप्रतिनिधी व ज्यांचा बालकमंत्री म्हणून उल्लेख केला गेला होता, या सर्वांच्या कचखाऊ वृत्तीमुळे, बांधकामास सुरुवात करणारी डॉ. बेग, इंडीयन सिमलेस पाईप्स, एल & टी यांच्या सारख्या अनेक कंपन्या रातोरात दुसरीकडे गेल्या. या अशा कारणांमुळे सातारा एमआयडीसीची खरी वाट लागली हे त्यांना सुध्दा माहिती आहे. मात्र, त्यांना जळी, स्थळी, काष्ठी सर्वत्र उदयनराजेच दिसतात म्हणून आमच्या नावाने नेहमीप्रमाणे ओकतात, असा आरोप त्यांनी केला. साताराबरोबरच सुरु झालेली नगरची एमआयडीसी आज कुठच्या कुठे गेली आहे. त्यांनी वस्तुस्थिती समजून घेवून वक्तव्य करावे. साप समजुन भुई थोपटण्याची सवय सोडावी. पडद्या. आडून गुन्हे करणाऱ्या (व्हाईट कॉलर) क्रिमिनल्सनी दुस-यांवर आरोप करणे त्यांना शोभुन दिसते. त्यांनी केलेल्या आरोपांना आपण आणि सामान्य जनता काडीचीही किंमत देत नाही, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

ShivendraSinh Raje Bhosale, Udayan Raje Bhosale
राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडले असते : उदयनराजेंचा इशारा

वय वाढले कि बाल बुध्दी येते मग राजकारणातील त्यांच्या पेक्षा सर्व जेष्ठ व्यक्तींचीही बालबुध्दी आहे असेच त्यांना म्हणायचे आहे का. असे असेल तर मात्र, नक्कीच मोठा मानसिक धक्का त्यांना बसला असावा आणि आता त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे. त्यांच्या बालबुध्दी वक्तृत्वाची त्यांच्यापेक्षा जेष्ठ असलेल्या राजकारणी व्यक्ती नक्कीच नोंद घेतील आणि ते सर्व मिळुन त्यांना आणखी पक्षविरहीत धक्के देतील. काळजी वाटते, असेही ते म्हणाले. थंड रक्ताचे नाही. सर्वसामान्यांवरील अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्यासारखे अन्यायाला विरोध करणारच. पंडीत ऑटोमोटिव्हच्या जागेसह सर्वच व्यवहार झालेल्या जागांची न्यायालयीन चौकशी लावणारच आहे. त्यात सर्व काही बाहेर येईल, असेही उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in