आमदार शिंदेंनी मागितली माफी, पराभवामागे मोठे षडयंत्र

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयावर दगडफेक केली.
आमदार शिंदेंनी मागितली माफी, पराभवामागे मोठे षडयंत्र
Shashikant Shinde

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा एका मताने पराभव झाला. तर जावळी सोसायटी मतदारसंघात विजयी ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) बहुमताने निवडून आले. या निकालानंतर शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकी विरोधात शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे.

दरम्यान, या पराभवामागे मोठं कारस्थान असल्याचा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात हे केलं, हे योग्य नाही. मी सर्वांची माफी मागतो,'' असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.

Shashikant Shinde
शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड

शशिकांत शिंदे म्हणाले, ''मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की मला ज्यांनी उभा केलं त्या पक्षाच्या कार्यालयाविरोधात जी भूमिका घेतलीय ती योग्य नाही. मी पवार साहेबांसह सर्वांची माफी मागतो. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर मी माफी मागतो. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे असं नाही होणार, मी आजही पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी पक्षासाठी जीव देईन, माझ्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी कोणत्याही प्रकारची भूमिका घेऊ नये,'' असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप खुद्द शरद पवार व अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर श्रेष्ठींनी पाठविला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचाही निरोप प्रमाण न मानता शशिकांत शिंदे यांना पाडण्याचे काम राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. हा पराभव आपल्याच लोकांनी केल्याचे सांगत सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर तुफान दगडफेक केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in