सांगोल्यात पुन्हा होतेय बापूंच्या लाल दिव्याची चर्चा

Eknath Shinde| Shaji Patil : बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत शहाजी पाटील गेले आहेत.
Shahaji Patil Latest Marathi News
Shahaji Patil Latest Marathi NewsSarkarnama

सांगोला : राज्यात नाराजी नाट्यामुळे राजकिय सत्तासंघर्ष पाहायला मिळत असतानाच सत्तेमध्ये मित्रपक्ष बदलले जाईल, नवीन सरकार स्थापन होईल, या नाराजी नाट्यामध्ये सामील असलेले सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे शिवसेनेचे (Shivsena) एकमेव सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांना नव्या मंत्रिमंडळात लाल दिवा मिळणार असल्याची गेली दोन दिवस झाले सगळीकडेच चर्चा सुरू आहे. (Shahaji Patil Latest Marathi News)

Shahaji Patil Latest Marathi News
Narayan Rane : 'संजय राऊत खूश! कारण सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल'

राज्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाराजी नाट्यामुळे राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपात त्यांच्यासोबत सुमारे 30 आमदार बाहेर गेले आहेत. या आमदारांमध्ये शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असलेले सांगोल्याचे शहाजी पाटील यांचा समावेश आहे. या अगोदरही पाटील व शिंदे यांचे घनिष्ठ संबंध होते. नगर विकास खात्याकडून आमदार शहाजी पाटील यांनी सांगोला शहरासाठी मोठ्याप्रमाणात निधीही आणला आहे.

Shahaji Patil Latest Marathi News
गुलाबराव 'सरकारनामा'शी बोलले : मी गुवाहटीला चाललो... हितं काय करू?

दरम्यान, सध्या राजकीय भूकंपाचे प्रमुख हे एकनाथ शिंदेच असल्याने व सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले शहाजी पाटील हेही शिंदे यांच्या बरोबरच आहेत. राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन या सरकारमध्ये पाटील यांना लाल दिवा निश्‍चितपणे मिळेल. याबाबत चौकाचौकातून, हॉटेल्समधून चर्चा सुरू झाली आहे.

पुन्हा लाल दिवा की फक्त चर्चा

या अगोदर आमदार शहाजी पाटील हे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे विरुद्ध कायमस्वरूपी लढत होते. अपवाद वगळता त्यांना अनेक पराभवाना सामन करावा लागला होता. अनेक वेळेच्या पराभवनंतर त्यांना महामंडळ मिळेल, महामंडळाद्वारे लाल दिवा मिळेल, अशी या अगोदरही अनेक वेळा तालुक्यात चर्चा सुरु होत्या. सध्याही नाराजी नाट्याच्या राजकीय भूकंपानंतर बापूंच्या लाल दिव्याची पुन्हा एखदा चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com