Solapur News : शहाजी पाटलांविरोधात शेकापने थोपटले दंड : हस्तक्षेप वाढल्याने सांगोल्यातील सरपंच आक्रमक; लढाईची तयारी

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दलित वस्तीच्या कामांचा आणि आमदारांचा काय संबंध?
PWP's Sarpanch Meet Additional CEO
PWP's Sarpanch Meet Additional CEO Sarkarnama

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दलित वस्तीच्या कामांचा आणि आमदारांचा काय संबंध, असा प्रश्न उपस्थित करत सांगोला (Sangola) तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या (PWP) ४५ सरपंचांनी (Sarpanch) सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्या हस्तक्षेपाबद्दल बंड पुकारले आहे. (MLA Shahaji Patil's interference Stop : PWP's complaint to Additional CEO)

सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांचा कामकाजात हस्तक्षेप वाढल्याने शेकापच्या सरपंचांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्यालय गाठत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत आमदारांचा हस्तक्षेप थांबविण्यात यावा, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आगामी काळात सांगोल्यात शेकाप आणि शहाजी पाटील यांच्या गटात वाद पेटणार हे मात्र नक्की.

PWP's Sarpanch Meet Additional CEO
Konkan News : भास्कर जाधवांना गुहारमध्येच मोठा धक्का : ‘खरेदी-विक्री’च्या निवडणुकीत भाजप, शिंदे गटाने उडवली दाणादाण

सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. २३ जानेवारी) जिल्हा परिषदेत येऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेतली. या निधीत आमदारांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका, अशी मागणीही या वेळी शेकापकडून करण्यात आली.

PWP's Sarpanch Meet Additional CEO
Nagar Lok Sabha : नीलेश लंके देणार सुजय विखेंना आव्हान : नगर लोकसभा लढविण्याचे संकेत

दलित वस्ती योजनेच्या कामांसंदर्भात ग्रामपंचायतींनी केलेला ठराव ग्राह्य का धरला जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत सरपंचांकडून करण्यात आलेली यादी ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणीही या शिष्टमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्याशी चर्चा करून याबद्दल निर्णय घेऊ, असा शब्द अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी शिष्टमंडळाला दिला.

PWP's Sarpanch Meet Additional CEO
ShivSena-VBA Alliance : मागील काळात आम्हाला वाईट अनुभव आलाय... शिवसेना-वंचित युतीवर काँग्रेसचे भाष्य

यावेळी सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा कारंडे, दादासाहेब बाबर, संगम धांडोरे, संतोष पाटील, संतोष देवकते, बाळासाहेब काटकर, कल्याण लुबाळ, राजेंद्र देशमुख, संजीवनी लुबाळ, शाहजी गडहिरे, जयंत बाबर, ऋषीकेश शेटे, शरद हिप्परकर, गजेंद्र कोळेकर, दीपक गोडसे यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

PWP's Sarpanch Meet Additional CEO
VijayDada Meet Pawar : विजयदादा बारामतीत जाऊन शरद पवारांना भेटले....

आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाची लढाई जिल्हा परिषदेच्या व विधानसभेच्या सभागृहात पाहिली आहे. सभागृहाच्या बाहेरही आम्ही लढाई करण्यास तयार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in