महाविकास आघाडी स्थापनेसाठी किती खोक्यांचा सौदा झाला?; शहाजी पाटलांचा पलटवार

Shahaji Patil : पक्षाच्याच आमदारांना उद्धव ठाकरेंशी बोलू दिले जात नव्हते.
Shahaji Patil-Vinayak Raut Latest News
Shahaji Patil-Vinayak Raut Latest NewsSarkarnama

सांगोला : सत्तेला ठोकर मारून पन्नास जण बाजूला का झाले याचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा काही जण गद्दारी व खोक्यांवरच बोलत आहेत. निवडणुकीत भाजपबरोबर युती असताना सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर किती खोक्यांचा सौदा होऊन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन झाली हे अगोदर त्यांनी सांगावे,असा घणाघाती आरोप सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) यांनी केला आहे.

Shahaji Patil-Vinayak Raut Latest News
सिसोदिया यांच्याकडे भाजप नेत्याचे 'ते' रेकॉर्डिंग

सांगोल्यात नुकतेच शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांची जाहीर सभा झाली होती. या सभेमध्ये खासदार राऊत यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या बंडखोरीबद्दल मोठी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्यावर पलटवार केला.

शहाजी पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जणांनी एकत्रित एक शिवसेनेमध्येच वेगळा गट स्थापन केला आहे. हे आमदार कोणत्या कारणांसाठी आपल्यापासून दूर गेले आहेत याचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अद्यापही काहीजण नको त्या गोष्टीवरच चर्चा करीत आहे. विनायक राऊत, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अशा काही मंडळी उद्धव ठाकरे जवळ राहून आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करीत होते. पक्षाच्याच आमदारांना उद्धव ठाकरेंशी बोलू दिले जात नव्हते.

Shahaji Patil-Vinayak Raut Latest News
लोक त्यांना विचारु लागलेत गद्दारी का केली : उद्धव ठाकरे

विनायक राऊत यांनी सांगोल्यातील सभेत निधीबाबत चुकीची माहिती दिली असून सांगोल्याच्या दिलेल्या निधीबद्दल त्यांनी बोलण्यापेक्षा शिवसेनेचाच मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या आमदारांना व काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदारांना किती निधी दिला याबाबत त्यांनी जाहीरपणे सांगावे. सांगोल्यातील कामाबाबत विनायकरावतांकडे पत्रे दिली होती परंतु त्यातील एकही काम पूर्ण केले नाही. परंतु हेच चौकटीतील मंडळी आज महाराष्ट्रभर फिरून राजकारणातील खालच्या पातळीवर येऊन टीका करीत आहेत. विनायक राऊत यांना सांगोल्याचा इतिहास-भूगोल माहीत नसतानाही विकासावर, निधीवर बोलत व टीका करीत आहेत. परंतु मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन या टीकेला निश्चितपणे उत्तर देऊ, असेही शहाजीबापू म्हणाले.

येणाऱ्या निवडणुकांपेक्षा विकासावरच माझे लक्ष

शिवसेनेतच बंडखोरी केल्याबद्दल अनेक जण मला यापुढील निवडणुकीत त्यांनी विजयी होऊन दाखवावे, निवडणुकीत उभे राहावे, असे आवाहन देत फिरत आहेत. परंतु मी अशा छोट्या - मोठ्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमधून सांगोल्याच्या विकासासाठी, येथील पाणी सिंचनासाठी व इतर अनेक कामांसाठी जेवढा निधी आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीपेक्षा सांगोल्याच्या विकासावरच मी जास्त लक्ष देत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com