मी मंत्रिपदाच्या रेसमध्ये कधीच नव्हतो; सचिन कल्याणशेट्टी

भाजप (BJP) आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, मी मंत्रिपदाच्या रेसमध्ये नाही
Sachin Kalyanshetti
Sachin KalyanshettiSarkarnama

सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) संघटनेपासून सरपंच ते आमदार असा माझा राजकीय प्रवास आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझी दखल घेतल्यानेच मी आमदार झालो आणि आता जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपदाची मागणी करणे, ही माझी ऐपत नाही, त्यामुळे मी मंत्रिपदाच्या रेसमध्ये कधीच नव्हतो. त्या अफवा होत्या, असे स्पष्टीकरण आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी दिले.

Sachin Kalyanshetti
Chandrakant Patil; पुण्याच्या दोन महाापलिका व्हायला हव्यात !

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. यापूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आता तो भाजपचा बोलकिल्ला बनला आहे. जिल्ह्यातील भाजपचे प्राबल्या कायम टिकवून ठेवत पक्ष, संघटना आणखी मजबूत कशी करता येईल, यावर लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये भाजपची शतप्रतिशत सत्ता आणली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष पद पदरी टाकून पक्षाने मंत्रीपदाच्या रेसमधून बाहेर काढले का? या यावर बोलना ते म्हणाले, पक्षाने मला भरभरून दिले आहे. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर मी मंत्रीपदावर कसा दावा करू शकतो? मला मंत्रीमंडळात घ्यावे, यासाठी मी आजपर्यंत कोणालाही भेटलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

Sachin Kalyanshetti
उद्धव ठाकरेंचे 'आनंद दिघे' यांच्या घरी एकनाथ शिंदेंची धडक

पक्षातील माझे काम पाहून पक्षानेच मला नव्याने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. मला उद्या पक्षाने तालुकाध्यक्ष केले तरी मी त्याच ताकदीने काम करू शकतो. पक्षामध्ये मतभेद असतील, मात्र, नेतृत्व एकहाती असल्याने याचा कोणाला फटका अथवा फायदा होऊ शकत नाही, असेही आमदार कल्याणशेट्टी यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in