झेडपी निकाल अन् छाप्याचा काही संबंध आहे का?

अजित पवार (ajit pawar) यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर आणि संचालकांच्या घरांवर आयकर विभागाने आज छापे टाकले. रोहित पवार (mla rohit pawar) यांनी भाजपवर टोमणा मारला आहे.

झेडपी निकाल अन् छाप्याचा काही संबंध आहे का?
rohit pawarsarkarnama

अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या घरी, शिवालिक ग्रुप, चोराडिया, डीबी रियालिटी अशा काही ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या छापेमारीवरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांनी भाजपवर टोमणा मारला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

रोहित पवार म्हणाले, ''जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल कालच लागला. त्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. तर लगेच दुसऱ्या दिवशी छापे पडले. त्यामुळे कालचा निकाल आणि आजच्या छाप्याचा काही संबंध आहे का हे पाहावं लागेल. राजकीय हेतूनं हे होत असेल तर लोक त्याला कंटाळली आहे. अशाप्रकारे वागणं योग्य नाही,''

अजित पवार (ajit pawar) यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर आणि संचालकांच्या घरांवर आयकर विभागाने आज छापे टाकले. यानंतर अजित पवार यांनी सांगितले,''सत्तेचा गैरवापर आम्ही कधी केला नाही, पण माझ्या नातेवाईकांवरच का कारवाई केली, याचे वाईट वाटतं,''

rohit pawar
अजितदादांना आता कुंटुबिय आठवतेय का?

''आयकर विभागाने कुठे छापेमारी टाकावी हा त्यांचा अधिकार आहे. मी सर्व टॅक्स भरतो. राजकीय हेतूने ही कारवाई आहे. यात काय सापडलं हे तेच सांगतील. सत्तेचा गैरवापर कधी आम्ही केला नाही, पण माझ्या नातेवाईकांवरच का कारवाई केली, याचे वाईट वाटतं. माझ्या बहिणी ज्यांचे 35 वर्षांपूर्वी लग्न झाली आहेत. त्यातील एका बहिणीचा कोल्हापूर येथील कारखान्यावर तर पुण्याच्या बहिणीच्या दोन कारखान्यावर का धाडी टाकल्या ? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.