
Solapur News : सोलापूरमधील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पीडित अल्पवयीन मुलीची बोटे छाटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस हवालदार निलंबित झाले होते.
याप्रकरणी विधान परिषदेत प्रश्नही उपस्थित झाला. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या अत्याचाराविषयी फोटोसह १८ मार्चला ट्विट करताच बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्याची बदनामी सहन केली जाणार नाही, असा इशारा नाव न घेता खासदार संजय राऊत यांना दिला.
संजय राऊतांनी ट्विट केल्यानंतर बार्शी तालुक्यात या विषयी चर्चेला उधाण आलं. यावर आमदार राऊतांनी शनिवारी (ता.१८) रात्री उशिरा माहिती दिली. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, ''संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ट्विट केलं ही दुर्दैवी बाब आहे. कारण ही घटना ५ मार्चला घडली. पीडितेवर अन्याय होताच पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई केली आहे'', असं ते म्हणाले.
''या घटनेशी कोणत्याही पक्षाचा कसलाही संबंध नाही. तो गावातील मर्यादित प्रश्न असून कोणत्याही समाजाचा नाही. विनाकारण राजकीय द्वेषापोटी टीका करायची तालुक्यातील भाजप गुंडांनी म्हणणे हे देखील दुर्दैवी आहे. रोज सकाळी उठून भडक बोलायचे हा त्यांच्या सवयीचा भाग आहे'', अशी टीका आमदार राजेंद्र राऊत यांनी केली.
''माध्यमांनी वास्तवता काय आहे? प्रकार काय आहे? कधीपासूनची घटना आहे? याची सर्व शहनिशा करुन खात्रीशीर माहिती घ्यावी. पण संजय राऊतांचा चेहरा पाहिला की दुसरी वृत्तवाहिनी पहायची वेळ येऊ लागली आहे'', असा टोला आमदार राऊतांनी लगावला. ''यापुढे आम्ही बदनामी सहन करणार नाही'', असंही आमदार राजेंद्र राऊतांनी स्पष्ट केलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.