चुकीची गोष्ट घडू नये; म्हणून मद्यप्राशन करून आलेल्या त्या कामगाराला मारले : राजेंद्र राऊत

त्याने मद्यपान केल्याचे दिसताच वडिलकीच्या नात्याने समजावून सांगण्यासाठी त्या कामगाराच्या कानशिलात लगावली
Rajendra Raut
Rajendra Raut Sarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी (Barshi) शहरातील एका कार्यक्रमाचा समारोप सुरु असताना माझ्या बंधूंच्या खडी मशिनवर कामाला असलेल्या तरुण कामगाराने मद्यपान करून येऊन मला नमस्कार केला. त्याने मद्यपान केल्याचे दिसताच, तसेच त्याच्याकडून कोणतेही चुकीचे कृत्य घडू नये; म्हणून वडिलकीच्या नात्याने समजावून सांगण्यासाठी त्या कामगाराच्या कानशिलात लगावली, असे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी सांगितले. (MLA Rajendra Raut reveals the beating of a worker on stage)

आमदार राऊत यांनी एका कार्यकर्त्याला स्टेजवर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, त्या व्हिडिओमागील सत्यता आमदार राऊत यांनी ‘सरकारनामा’शी बोलून सांगितली. विरोधकांकडून अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल करून माझी वारंवार बदनामी करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Rajendra Raut
काटेवाडीला‌ पाणी नेण्याचा अजित पवारांचा डाव : राष्ट्रवादीच्या संजय पाटलांचा आरोप

संबंधित तरुण हा मागील दहा वर्षांपासून माझे बंधू विजय राऊत  यांच्याकडे कामाला आहे. तो दारू पिऊन कार्यक्रमस्थळी आला होता. तो नेहमीच काहींना काही उपद्‌व्याप करत असतो. मद्यपान करून कार्यक्रमाच्या स्टेजवर येऊन तो अनेकांच्या पाया पडत होता. तो दारू पिला असल्यामुळे त्याच्याकडून कोणतेही चुकीची गोष्ट घडून नये, यासाठी समजावण्याच्या भूमिकेतून मी त्या कामगाराला मारले. त्यानंतर आमच्याच कार्यकर्त्यांनी त्यास घरी नेऊन सोडले, असेही आमदार राऊत यांनी या वेळी सांगितले.

Rajendra Raut
पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण

तांत्रिक अडचणींमुळे मागील आठवड्यापूर्वी बार्शी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. आता तो सुरळीत सुरु झाला आहे. बार्शी शहर व तालुक्यातील सामान्य जनतेसाठी आपण अहोरात्र कार्यरत असतो, या घटनेचा पाणी पुरवठ्याशी काहींही संबंध नाही.

विरोधकांनी प्रसार माध्यमांना चुकीची माहिती देऊन व्हिडिओ जाणूनबुजून व्हायरल केला आहे. तसेच, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे आमदार राऊत यांनी या वेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in