‘काय झाडी, काय डोंगार’ वाल्यांचे ओक्के असेल; पण जनता ‘नॉट ओके’ आहे!

काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांची सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर नाव न घेता टीका
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama

सोलापूर : राज्याला स्थिर सरकार मिळाले, तर महागाई कमी होईल. अशी आशा वाटते. कारण, केंद्राकडून महागाई कमी होताना दिसत नाही. आज सिलिंडरचा दर ११०० रुपये झाला आहे. दोन वेळचे जेवण बनवणेही कठीण झाले आहे. तरीही कोरोनानंतर आलेल्या निर्बंधमुक्त नागपंचमीच्या सणामुळे आज सर्व आनंदित आहेत. आज सरकार बदलून ३५ दिवस झाले. तरीही फक्त दोघांवरच सरकार चाललंय. काय ते झाडी, काय ते डोंगार, असे त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचं ‘नॉट ओके’ आहे, असा टोलाही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांना नाव न घेता लगावला. (MLA Praniti Shinde criticizes Shahaji Patil without naming him)

आमदार शिंदे या नागपंचमीच्या निमित्ताने सोलापुरात आल्या होत्या. त्या वेळी माध्यमांशी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. प्रणिती शिंदे यांनी या वेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत यांच्या ईडीच्या चौकशीवरून भाजपला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, खूप खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. जे प्रकरण २०१५ मध्ये बंद झालंय, ते आज पुन्हा काढून सोनिया गांधींना त्रास दिला जातोय. केवळ हम बोले सो कायदा दाखवण्याचे काम सुरू आहे. सोनिया गांधी या देशाच्या एवढ्या वरिष्ठ नेत्या, एका मोठ्या पक्षाच्या प्रमुख असून त्यांना दहा-दहा वेळा ईडीकडून चौकशीला बोलवले जाते. राहुल गांधी यांना बोलावून घेताय. सहा-सहा तास चौकशीला बसवताय आणि एकच तास चौकशी करताय, तीही व्यर्थ. ही कसली पद्धत, असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

Praniti Shinde
मुख्यमंत्री शिंदेंची संवेदनशीलता : ताफा थांबवून घेतला आंदोलकांचा मोबाईल नंबर!

आमदार शिंदे म्हणाल्या की, पार्लमेंटमध्ये भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या हमरी तुमरीची भाषा करतायत. भाजपची खालच्या पातळीला जाऊन ॲटॅक करण्याची जी संस्कृती आहे, ती दिसून येत आहे. मात्र, स्मृती इराणींचे सिलिसोलचे प्रकरण काय आहे, ते तुम्हाला माहिती आहे. इंस्टाग्रामवर त्यांची पोस्ट डिलीट करतात, त्यामुळे मला असे वाटते की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेकू नये. मात्र, भाजपची तशी संस्कृतीच नाही, त्यांच्या लोकांची ही नाही.

Praniti Shinde
जिल्हा बॅंकेचे बडे थकबाकीदार राजेंद्र राऊतांच्या रडारवर; ‘आर्यन शुगरची येणेबाकी सोपलांकडून वसूल करणार का?'

महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्यावर कोणीही काहीही बोलत नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मराठी माणसाचे योगदान असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ईडीची भीती दाखवून आमच्या नेत्यांना छळत आहेत. मात्र, मूळ मुद्दे सोडून महागाईचा चटका ज्यांना बसतो, त्यावर कोणी बोलत नाही. भाजप आणि मोदींकडून चुकीच्या पद्धतीने लोकशाहीची हत्या करताना पाहायला मिळतेय, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.

Praniti Shinde
निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही : राजन पाटलांचा राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना इशारा

नागपंचमी हा आपला सण आहे. घरोघरी पुरण-पोळी करतात, नागोबाची पूजा करतात. जागोजागी महिला झोका बांधून खेळ खेळतात. पण, महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी त्याची खंत वाटते. आज पुरणपोळी बनवताना दहादा विचार करावा लागतो. कारण, सर्वांवर महागाईचा डोंगर कोसळला आहे. सर्व किराणा वस्तू महाग झाल्या आहेत, त्यामुळे दहा वेळा विचार करावा लागतो की आज पुरणपोळी कशी बनवायची, असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

Praniti Shinde
राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांबाबत विचारताच मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर देणं टाळलं...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की देशात फक्त भाजपच राहणार. बाकी सर्व प्रादेशिक पक्ष आम्ही संपवणार आहोत. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा देखील म्हणाले होते की शिवसेना को हमे जडसे खतम करना है. आज त्यांचा छलकपट, कट होताना दिसत आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी नड्डा आणि शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com