आमदार प्रकाश आवाडेंनी घेतली जितेंद्र आव्हाडांची भेट!

लवकरच संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री आव्हाड यांनी प्रकाश आवाडे यांना दिली.
आमदार प्रकाश आवाडेंनी घेतली जितेंद्र आव्हाडांची भेट!
Prakash Awade- Jitendra AwhadSarkarnama

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : इचलकरंजी शहरातील जयभीम झोपडपट्टीतील प्रलंबित १०८ घरकुलांच्या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी मुंबई येथे राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची भेट घेतली. लवकरच संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री आव्हाड यांनी दिली. (MLA Prakash Awade meet to Jitendra Awhad)

इचलकरंजी शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शहरातील २३ झोपडपट्ट्यांचे आहे. तेथे पुनर्वसन होण्यासाठी आमदार आवाडे यांनी पुढाकार घेतला. सरकार दरबारी पाठपुरावा करीत त्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून दिली होती. मात्र, काही गोष्टी व विरोधामुळे ही योजना पूर्णत: साकारता आली नाही. नेहरुनगर येथे बैठी घरेच व्हावीत, या मागणीमुळे तेथे केवळ बहुमजली एकच इमारत पूर्ण होऊन पुढील काम थांबले. आमदार आवाडे यांनी दिलेला विश्‍वास आणि भागातील नगरसेवक सुनील पाटील यांनी केलेले प्रयत्न यामुळे जयभीम झोपडपट्टीतील नागरिकांनी सहकार्य करीत घरकुलांसाठी जागा दिली.

Prakash Awade- Jitendra Awhad
'नोकरीवरून काढण्याची धमकी देत कर्मचाऱ्यांचा भाजप प्रवेश केला जातोय...'

येथे ६२२ घरकुले पूर्ण झाली आहेत. तेथे आता लाभार्थी राहत आहेत, तर येथील उर्वरित १०८ घरकुलांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. हा मार्गी लागण्याबाबत आमदार आवाडे यांनी गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती देत प्रलंबित काम तातडीने पूर्णत्वास नेण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली. या वेळी माजी नगरसेवक सुनील पाटील उपस्थित होते.

Prakash Awade- Jitendra Awhad
अजितदादा मुख्याध्यापकाला दिलेला शब्द पाळणार का?

झोपडपट्टीवासीयांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे

सध्या महाराष्ट्र सरकारची झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात कोणत्याही प्रकारची योजना नाही. त्यामुळे झोपडपट्टीमुक्त संकल्पना साकारण्यात अडचणी येत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ववत सुरू करून आहे. झोपडपट्टीवासीयांचे आहे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करीत आमदार आवाडे यांनी या वेळी मंत्री आव्हाड यांचे लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.