Gopichand Padalkar : आमदार बाबरांच्या जागेवर पडळकरांचा दावा; बाबर म्हणाले, जरा थांबा...

Gopichand Padalkar News : आमदार पडळकर यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले
Gopichand Padalkar and Anil Babar
Gopichand Padalkar and Anil Babar Sarkarnama

Gopichand Padalkar and MLA Anil Babar News : खानापूर विधानसभा मतदारसंघातून यापुढच्या काळात विद्यमान आमदार अनिल बाबर लढणार नाहीत, असे विधान करून आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. आमदार बाबर हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढच्या काळात खानापूरमधून आपणच उमेदवार असू, असे घोषीत करून आमदार पडळकर यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. आटपाडी-खानापूरचा पुढचा आमदार माझ्या रूपाने भाजपाचाच असेल, असे आमदार पडळकर यांनी जाहीर केले आहे.

आमदार पडळकर यांच्या विधानावर राज्यभर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. खानापूर मतदारसंघातही यावरून खळबळ उडाली. या पार्श्वभीमीवर विद्यमान आमदार बाबर यांनी मात्र या विषयावर मौन बाळगले आहे. दोन दिवस ते राज्याबाहेर होते. आज नागपुरात परतल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता, या विषयावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. या विषयावर मी आता बोलणार नाही. वेळ येताच सविस्तर बोलेन, असे आमदार बाबर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Gopichand Padalkar and Anil Babar
Winter Session : आम्ही शांत झालो नाही, उद्या पहा सत्तारांचे काय होते ? दानवेंचा इशारा..

राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी असा प्रवास केलेल्या पडळकर यांनी चार वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत बस्तान बसविले. त्यांना भाजपाने विधान परिषदेवर संधी देत आमदार केले. गेल्या लोकसभेसाठी त्यांनी सांगली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत तब्बल साडेतीन लाख मते मिळविली.

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय पाटील यांची पडळकर यांनी चांगलीच दमछाक केली होती. आमदार पडळकर यांची मंत्रीपदावर नजर आहे. त्यादृष्टीने विधानसभेवर निवडून जाण्याची तयारी आमदार पडळकर यांच्याकडून सुरू आहे. निवडून येण्यासाठी आमदार पडळकर यांना आटपाडी-खानापूर मतदारसंघ सोयीचा आहे. त्यामुळे या मतदारसंघात यापुढच्या काळात बस्तान बसविण्याचा पडळकर यांचा विचार आहे.

Gopichand Padalkar and Anil Babar
Sushma andhare : सुषमा अंधारेंचं आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारणार का?

धनगर आरक्षणाचा विषय उपस्थित करून आपण धरनगरांचे राज्यातील तरूण नेते आहोत हे ठसविण्यात आमदार पडळकर यशस्वी झाले आहेत. पवार कुटुंबिंयावर बेछुट आरोप करीत राज्यभर प्रसिद्धी मिळविण्याचे तंत्रदेखील त्यांनी अवगत केले आहे. भाजपाचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्यावर विशेष लक्ष असल्याने पडळकर सध्या जोरात आहेत.

या जोशात त्यांनी थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार असलेल्या बाबर यांच्या जागेवर दावा ठोकला आहे. येत्या काही दिवसात आमदार बाबर यांची भूमिका स्पष्ट होईल. त्यानंतरच आमदार पडळकर यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in