आमदार नीलेश लंके व विजय औटी यांची प्रतिष्ठेची लढाई

पारनेर ( Parner ) नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाल्याने आमदार नीलेश लंके ( MLA Nilesh Lanke ), माजी आमदार विजय औटी ( Vijay Auti ) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) यांचे कार्यकर्ते राजकीय आडाखे तयार करण्यात व्यस्त झाले आहेत.
Vijay Auti & Nilesh Lanke
Vijay Auti & Nilesh LankeSarkarnama

पारनेर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, शिर्डी, कर्जत व अकोले या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम काल ( बुधवारी ) राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूक कार्यक्रमानुसार 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय हलचालींना वेग आला आहे. MLA Nilesh Lanke and Vijay Auti's battle for prestige

पारनेर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नीलेश लंके यांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तसेच खासदार डॉ. सुजय विखे भारतीय जनता पक्षाचे स्वतंत्र उमेद्वार उभे करणार की शिवसेनेला मदत करणार यावर बरचसे विजयाचे गणित अवलंबून आहे.

Vijay Auti & Nilesh Lanke
पारनेर नगर पंचायतचे प्रभाग आरक्षण जाहीर

याशिवाय पूर्वीचे निवडून आलेले अपक्ष नगरसेवक पुन्हा एकदा स्वतंत्र विकास मंडळ तयार करून निवडणुकीत उतरले तर मात्र नगरपंचायतीत बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे. निकालही धक्कादायक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यासाठी एक डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे. 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. व दुसऱ्याच दिवशी 22 डिंसेंबरला मत मोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

Vijay Auti & Nilesh Lanke
शिवसेेनेचे विजय औटी विधानसभा लढणार नाहीत, स्वतःच केली घोषणा

निवडणूक जाहीर होताच पारनेरचे राजकारण तापले आहे. सध्या नगरपंचायतीवर गेली एक वर्षापासून प्रशासक आहे. नगरपंचायतीची मुदत गत ऑक्टोंबरमध्येच संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती.

पारनेर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही दुसरीच निवडणूक आहे. पहिली निवडणूक 2015 साली झाली होती. त्या वेळी कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने अपक्षांच्या मदतीने शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय औटी यांनी सत्ता स्थापन केली होती. शिवसेनेच्या सीमा औटी या प्रथम अडीच वर्षे सभापती झाल्या होत्या. त्या नंतर त्यांची मुदत संपल्यावर पुढील अडीच वर्षासाठी सभापती निवड होताना मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. त्या वेळी अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसनेचे काही नगरसेवक फोडून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या वर्षा नगरे यांनी बाजी मारत नगराध्यक्ष पद मिळविले होते.

Vijay Auti & Nilesh Lanke
कोण म्हणतं मी राजकारणातून बाजूला गेलो : विजय औटी

निवड झाल्या नंतर काही दिवसांतच त्यांच्यातही कुरबुरी सुरू झाल्या. त्यामुळे नगरे यांनी पुन्हा शिवसेनेचे माजी आमदार औटी यांच्या मदतीने शिवसेनेचे पाठबळ मिळवत कसेबसे आपले पद शेवटपर्यंत अडीच वर्ष टिकवले होते.

नगरपंचायतीसाठी पहिली 2015 साली निवडणूक झाली. त्या वेळी शहराचे मतदान सुमारे 8 हजार 700 होते. तर आता मात्र त्यात वाढ होऊन 11 हजार 810 आहे. त्या वेळी शिवसेनेला 9, राष्ट्रवादीचे 2, काँग्रेसचा 1 तर अपक्ष 5 जण निवडून आले होते. मात्र निवडणूक झाल्यावर अडीच वर्षानंतर निवडून आलेले शिवसेनेच तीन व अपक्ष दोन असे पाच नगरसेवक फुटून राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन मिळाले होते.

Vijay Auti & Nilesh Lanke
लोकसभा नकोच; तुम्ही राज्याचे आर. आर. आबा व्हा : नंदकुमार झावरेंचा नीलेश लंके यांना कानमंत्र

त्याची दखल थेट पक्षांनी राज्यपातळीवर घेतली होती. शेवटी मुख्यमंत्री पातळीवर समेट घडवून शिवसेनेच्या नगरसेवकांची पुन्हा घरवापसी झाली मात्र ती फक्त कागदोपत्री झाली. मनाने ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आलेच नाहीत.

या निवडणुकीत माजी आमदार औटी यांना आपले तालुक्यातील अस्तित्व राखण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. औटी हे पारनेर शहरात राहत. शिवाय माजी आमदार आहेत. नगरपंचायत स्थापन होण्यापूर्वी सुमारे 15 वर्षे त्यांचीच ग्रामपंचायतीतही सत्ता होती. नगरपंचायतीतही सुरवातीस व शेवटीही त्यांचेच वर्चस्व असल्याने त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची व अस्तित्वाची ठरणार आहे.

Vijay Auti & Nilesh Lanke
आमदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला केली सुरवात

प्रतिष्ठेची निवडणूक

नीलेश लंके आमदार झाल्या नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. शिवाय पारनेर शहर म्हणजे तालुक्याचे गाव आहे. त्या गावावर आपलेच वर्चस्व हवे. या साठी नगरपंचायतीवर आपलीच सत्ता यावी म्हणून ते प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. औटी यांना पुन्हा एकदा राजकारणात थांबविण्याची संधी लंके यांना प्रथमच आली आहे. ते ती सोडणार नाहीत. त्यामुळे आमदार लंके यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवाय विद्यमान आमदार असल्याने त्यांना ही निवडणूक जिंकावी लागणार आहे.

भाजपची स्वबळाची भाषा

शिवाय भारतीय जनता पक्षही ही निवडणुक स्वबळावर लढविण्याच्या तयारीत आहे तसे सुतोवाच प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वानाथ कोरडे यांनी केले आहे. मात्र खासदार डॉ.विखे शिवसेनेला मदत करणार की स्वतंत्र उमेद्वार उभे करणार यावर बरेच गणित अवलंबून आहे. मागील निवडणुकीत भाजपकडे एकही नगरसेवक नव्हता मात्र विखे भाजपमध्ये आल्याने त्यांना हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यांची सर्व मदार विखेंवर आहे.

Vijay Auti & Nilesh Lanke
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

अपक्षांची स्वतंत्र आघाडी

मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले पाच नगरसेवक पुन्हा एकदा स्वबळावर स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले तर नगरपंचायतीत पुन्हा एकदा कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही अशी अवस्था निर्माण होऊ शकते.

शहरात भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचे फारसे अस्तित्व सध्यातरी दिसत नाही. कारण या पुर्वीच्या नगरपंचायतीत भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेला एक नगरसेवक व काँग्रेसचाही फक्त एक नगरसेवक निवडून आलेला आहे.

Vijay Auti & Nilesh Lanke
नीलेश लंके म्हणतात, सर्वांना चीत करण्याची ताकद आमच्यात...

या मुद्द्यावर राष्ट्रवादी लढविणार निवडणूक

या निवडणुकीत पारनेर शहराच्या पाणी प्रश्नावर आमदार लंके निवडणूक लढवू पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या पिंपळनेर येथील कार्यक्रमात आमदार लंके यांनी पारनेर पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न चर्चेत आणला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या भाषणातून या योजनेसाठी मोठा निधी देण्याचे आश्वासन दिले होतो. या पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी भर देण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com