उदयनराजेंनी मकरंद पाटलांची घेतली फिरकी : तुम्ही तर जिल्ह्याचे...

किसनवीर कारखाना जिंकल्याबद्दल मकरंद पाटील (MLA Makrand Patil) यांनी घेतली भेट
Makrand Patil-Udyanraje
Makrand Patil-Udyanrajesarkarnama

सातारा : खासदार उदयनराजे (Udayanraje) यांनी आमदार मकरंद पाटलांना (MLA Makrand Patil) मिठ्ठी मारली आणि म्हणाले, तीन कारखाने, जिल्हा बँक आणि आमदारकी तुम्ही जिल्ह्याचे बॉसच की...किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल उदयनराजे यांनी मकरंद पाटलांचे सातारी कंदी पेढा भरवून कौतुक केले. (Udayanraje Latest news)

Udayanraje-Makrand Patil
Udayanraje-Makrand Patilsarkarnama

किसन वीर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या किसनवीर बचाव शेतकरी पॅनेलने 21-0 असे निर्विवाद वर्चस्व मिळवले. या यशानंतर आज आमदार पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांनी त्यांना मिठ्ठी मारून स्वागत केलं. यावेळी खासदार उदयनराजेंनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Makrand Patil-Udyanraje
संभाजीराजेंनी कोणत्या पक्षात जावे? लोकांनी सुचविले भन्नाट पर्याय...

तसेच तीन कारखाने, जिल्हा बँक आणि आमदारकी तुम्ही जिल्ह्याचे बॉसच की... असे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. यानंतर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सातारी कंदी पेढा मकरंद पाटलांना भरवला. यावेळी माजी सभापती सुनील काटकर व पदाधिकारी उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com