'किसन वीर' अध्यक्षपदी आमदार पाटील बिनविरोध; खंडाळ्यानंतर आणखी एका कारखान्यावर वर्चस्व

Makrand Patil | Kisan veer Sugar factory : कर्जाचे ओझे हलके करण्याचे आव्हान
Makrand Patil
Makrand PatilSarkarnama

सातारा : किसन वीर साखर कारखाना एकहाती काबिज केल्यानंतर अध्यक्षपदी वाईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज सकाळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. या निवडीनंतर कारखान्यावर पूर्णपणे मकरंद पाटील यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या किसन वीर साखर कारखाना निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजे २१ जागा जिंकत परिवर्तन घडवले आहे. त्यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार साडे नऊ ते दहा हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले. तर माजी आमदार मदन भोसले यांच्या पॅनेलला भाजपसह शिवसेना आमदार महेश शिंदेंचे पाठबळ मिळून देखील एकही जागा जिंकता आली नव्हती.

Makrand Patil
संजय राऊत आणि नवनीत राणा एकाच वेळी लेह-लदाखच्या दौऱ्यावर : प्रकाश जावेडकरही सोबत

या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. त्यात आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशीकांत शिंदे, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि प्रत्यक्ष रणांगणात असलेले आमदार मकरंद पाटील असे चार आमदार व एक सभापतींनी या निवडणुकीत लक्ष घातले होते.

Makrand Patil
पवारांची मोठी घोषणा; आगामी महापालिका, ZP निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे धोरण ठरले!

मकरंद पाटील यांना सभापती रामराजे, आमदार शशीकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साथ मिळाली. तर मदन भोसले यांना कोरेगावचे आमदार महेश शिंदेंसह भाजपचे पाठबळ मिळाले होते. पण, तरीही शेतकरी सभासदांनी मकरंद आबा व नितीन काका या पाटील बंधूंवर विश्वास दाखवत त्यांच्या हातात 'किसन वीर'ची सत्ता दिली.

मकरंद आबांकडे खंडाळा कारखान्यानंतर आता 'किसन वीर'ची सत्ता आली असून त्यांना या दोन्ही कारखान्यावरील कर्जाच्या डोंगराचे ओझे हालके करण्यासाठी प्रयत्न करतानाच कारखाने सुरू करून शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com