छत्रपती उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घ्या; आमदार महेश शिंदेंची मागणी

छत्रपती उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घ्या; आमदार महेश शिंदेंची मागणी
Summary

कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.

सातारा : कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी रयत शिक्षण संस्थेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना संस्थेच्या बॉडीवर घेतले जाते याचे दुःख वाटते. त्यामुळे जनतेचा विचार करून शरद पवार संस्थेचे अध्यक्षपद सोडतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील काही दिवसांपासून आमदार महेश शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेवरुन शरद पवारांना लक्ष केले आहे. ते सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका आणि वेगवेगळे आरोप करत आहे. खाजगीकरणाचा आरोप करताना शिंदे पुढे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतची घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री संस्थेचे अध्यक्ष असावे, अशी भूमिका मांडली होती. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली असल्याचा आरोप त्यांनी केला.

'रयत'मध्ये नोकरीला ४० लाख मागतात

'रयत'मध्ये आजच्या काळात नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने ४० लाख रुपये मागितले जात असल्याच्या चर्चा असल्याचा गंभीर आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. तसेच बारामतीच्या एकाच व्यक्तीला कायम संस्थेचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.

छत्रपती उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घ्या; आमदार महेश शिंदेंची मागणी
महाविकास आघाडीला दणक्याची तयारी : सेनेच्या तीन आमदारांवर भाजपचा डोळा

माझी उंची ६ फूट तर शरद पवारांची ६.२

माझी उंची ६ फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा २ इंचाने मोठी आहे, असे प्रत्युत्तर यावेळी आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिले. 'रयत' आणि शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आपली उंची तपासा असा सल्ला आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांना दिला होता. तसेच केवळ शरद पवार यांच्यामुळेच आज संस्था यशस्वी वाटचाल करत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

छत्रपती उदयनराजेंना बॉडीवर घ्या

यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पण तरीही खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना रयतच्या बॉडीवर घेतले नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे, असे मत व्यक्त करत त्यांना बॉडीवर घेण्याची मागणी केली. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. असंही महेश शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com