वल्गना करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; कोरेगाव स्मार्ट सिटी करणार...

कोरेगाव मतदारसंघात ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी नवे प्रकल्प निर्माण करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. नवे प्रकल्प उभारण्याच्या सर्व प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

कोरेगाव : वल्गना करणाऱ्यांकडे आता काही कामच उरले नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कोविड काळातील रचनात्मक कामाची शिदोरी आपल्या पाठीशी आहे. कोरेगावात विकासाचे नवे पर्व निर्माण करून शहरातील जनतेचे स्मार्ट सिटीचे व्हीजन पूर्णत्वास नेण्यासाठी लागेल तेवढा निधी मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.

कोरेगाव शहरातील शिवाजीनगर भागात नगरसेवक महेश बर्गे यांच्या प्रयत्नांतून आमदार महेश शिंदे यांनी मंजूर केलेल्या एक कोटी २० लाखांच्या विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुनील खत्री होते. या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी उपाध्यक्ष जयवंत पवार, नगरसेवक महेश बर्गे, महेंद्र पवार, सुनील बर्गे, राहुल र. बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, साहेबराव बर्गे, उदयसिंह बर्गे, राजेंद्रबुवा बर्गे, रितेश बर्गे, दीपाली बर्गे आदी प्रमुख उपस्थित होते.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
वाढदिनीच शशीकांत शिंदेंना महेश शिंदेंनी दिला धक्का; जिहे-कटापूरचे केले जलपूजन

आमदार शिंदे म्हणाले, ''टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत चांगल्या विचारांच्या लोकांच्या साथीने आपले काम सुरू आहे. वल्गना करणाऱ्यांकडे आता काही कामच उरले नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कोविड काळातील रचनात्मक कामाची शिदोरी आपल्या पाठीशी आहे. आपल्याला या मतदारसंघात ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी नवे प्रकल्प निर्माण करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे.'' नवे प्रकल्प उभारण्याच्या सर्व प्रयत्नांना साथ देण्याचे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
आमदार महेश शिंदे म्हणतात, आम्ही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी सामना करण्यास सज्ज 

सुनील खत्री म्हणाले, ''लोकांना अपेक्षित असलेले आमदार महेश शिंदे यांच्या रूपाने कोरेगावला मिळाले आहेत. शहरातील कार्यक्षम नगरसेवक, विरोधी पक्ष नेते महेश बर्गे यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे.'' सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, दत्तात्रय नलावडे यांची भाषणे झाली. नगरसेवक महेश बर्गे यांनी प्रास्ताविक व साहेबराव बर्गे, जगन्नाथ बर्गे, दीपाली बर्गे, महेंद्र पवार, डॉ. विघ्नेश बर्गे, राजेंद्र पारखी यांनी स्वागत केले.

Mahesh Shinde, Shashikant Shinde
येळगावकरांनी सांगितले जिहे कटापूरसाठीचे भाजप नेत्यांचे योगदान...

कोरोना काळातील लक्षवेधी कामाबद्दल आमदार शिंदे, सुनील खत्री, राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुभाषराव जाधव, सोनेरी ग्रुप, तसेच शिवाजीनगरमधील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिकांसह कोविड योद्ध्यांचा सन्मान नगरसेवक महेश बर्गे यांच्यातर्फे झाला. तत्पूर्वी ३०० ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिकांची मिरवणूक काढण्यात आली. बापूसाहेब जाधव यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in