दोन इंच जास्त उंचीच्या सायकलमुळे भिडेगुरुजी धोतर अडकून पडले

भाजप आमदार महेश लांडगे यांनी आज सांगली येथे जाऊन भिडेगुरुजींच्या तब्येतीची विचारपूस केली.
Mahesh Landge, Sambhaji Bhide
Mahesh Landge, Sambhaji BhideSarkarnama

पिंपरी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी (Sambhaji Bhide) हे गेल्या आठवड्यात सांगलीत सायकलवरून पडल्याने सध्या ते तेथील भारती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या खुब्याला फ्रॅक्चर झाल्याने दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. त्यांची पूर्वीची २२ इंच उंचीची सायकल २०२० च्या महापूरात वाहून गेल्याने ते सध्या २४ इंचीच्या सायकलवरून फिरतात. गणपती दर्शनासाठी चालले असताना या दोन इंच उंच सायकलमध्ये त्यांचे धोतर अडकून ते पडल्याने हा अपघात झाला. त्याला भिडेगुरुजींच्या संस्थेचे सांगली उत्तर भाग विभागप्रमुख राहूल बोलाज यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आज (ता.३ मे) दुजोरा दिला.

Mahesh Landge, Sambhaji Bhide
अयोध्या दौरा : राज आणि योगींची भेट होणार नाही....

दरम्यान, भिडे गुरुजींशी गेल्या १२-१३ वर्षांपासून कौटुंबिक स्नेह असलेले भोसरीचे भाजप (BJP) आमदार व पिंपरी-चिंचवडचे पक्षाचे अध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी आज सांगली येथे जाऊन भिडेगुरुजींच्या तब्येतीची विचारपूस केली. गुरुजींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी या भेटीनंतर सांगितले. तसेच लवकरच गुरूजी आपले कार्य पूर्ववत सुरू करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुरुजींवर उपचार करणारे डॉ श्रीकांत देशपांडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, स्थानिक आ. सुधीर गाडगीळ, खा. संजय पाटील यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन गुरुजींच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. विश्वजीत कदम हे, तर दर दोन तासांनी गुरुजींच्या तब्येतीची चौकशी करीत असून त्यांचे पुतणे हितेश हे रुग्णालयात उपचारांवर लक्ष ठेवून आहेत.

Mahesh Landge, Sambhaji Bhide
ट्रोल होताच प्राजक्ताने भोंग्यावरील ट्विट केलं डिलीट

आमदार लांडगेंच्या भेटीवर बोलताना बोलाज म्हणाले, राजकीय हेतूने अनेकांनी गुरूजींच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी रुग्णालयात येणे टाळले. मात्र, लांडगे आवर्जुन आले. त्यांचे व गुरुजींचे गेल्या १२-१३ वर्षांपासून कौटुंबिक नाते आहे. सांगली-कोल्हापूरला आल्यानंतर लांडगे हमखास गुरूजींना भेटतात. अनेकदा घरीही भेट देतात. तसेच गुरूजी पुण्यात आल्यानंतरही लांडगें त्यांची विचारपूस करतात. गुरूजींप्रती त्यांची आत्मियता आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com