आमदार लंकेंचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने केला सन्मान

कोरोना संकट काळात पारनेरचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी कोविड सेंटर चालविले.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Nilesh Lanke : कोरोना संकट काळात पारनेरचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी कोविड सेंटर चालविले. या कामाची जगभरात दखल घेण्यात आली. हे काम पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने आमदार लंके यांना सन्मानित केले आहे.

कोरोनात नैसर्गिक पद्धतीने उपचार केल्यास तो निश्चितच बरा होतो. हा प्रयोग यशस्वी करून दाखवत कोरोना सेंटरमध्ये हजारो रुग्णांना जीवदान दिले. कोरोनात सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील आयुर्वेदिक उपचाराच्या योगदानाबद्दल आमदार नीलेश लंके यांना नवी दिल्ली येथील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने सन्मानित केले.

Nilesh Lanke
नीलेश लंके यांनी विरोधकांचे त्रिफळा उडविण्याचे रचले मनसुबे

व्हिएतनाम रेकॉर्ड्‌स संघटनेचे सदस्य असलेल्या देशांबरोबर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ संस्थेकडून दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आमदार लंके म्हणाले, की कोविड काळात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉ. बिस्वरूप रॉयचौधरी यांच्या सहकार्याने मी देशातील पहिले नॅचरोपॅथी कोविड सेंटर सुरू केले. यात कोणत्याही औषधांशिवाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर यशस्वी नैसर्गिक उपचार करण्यात येत होते. त्यातून हजारो रुग्णांना जीवदान मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com