
MLA Mahesh Landge Visit Satara : 'वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन'चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पिसाळ यांचे शनिवारी (ता.२०) ह्रदयविकाराने अचानक निधन झाले. त्यांनी जगातील मराठा तरुणांचे संघटन करुन त्यांना स्वावलंबनाचा धडा देण्याचे कार्य केले. त्यांच्या या कामांची जाण ठेवून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पिसाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
आमदार लांडगे यांनी सातारा (Satara) जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील चोरडे गावी जाऊन बुधवारी (ता. २४) सकाळी पिसाळ कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबाला लागेल ती मदत देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रवीण यांच्या चार वर्षांची मुलगी शुभ्रा हिला शिक्षणासाठी दत्तकही घेतले. यासह पाच लाख रुपयांची मदतही देऊ केली. आमदार लांडगे यांनी अचानक घरी येऊन केलेले सहाकर्य पाहून प्रवीण यांची आई, पत्नी काजल व सर्व कुटुंब हेलावून गेले.
प्रवीण यांच्या निधनाची माहिती समजताच आमदार लांडगे यांनी भोसरीहून थेट साताऱ्यातील चोरडे गाव गाठले. यावेळी आमदार लांडगे (Mahesh Landge) यांनी ही मदत नाही, तर कर्तव्य पार पाडल्याची भावना व्यक्त केली. यावेळी लांडगे म्हणाले, "कुणालाही कधीही कसलीही मदत लागली, तर त्यांच्या पाठीशी प्रवीण खंबीर उभा राहत होता. त्याच्या कार्याची जाण आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे."
यावेळी आमदार लांडगे यांनी प्रवीण यांच्या आठवणींना उजााळा दिला. ते म्हणाले, प्रवीणने 'वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन'च्या माध्यमातून मराठा समाजातील (Maratha Community) तरुणांना संघटीत केले. त्यांना नोकरी, व्यवसायासाठी मदत करून पायावर उभे केले. समाजातील तब्बल एक कोटीहून अधिक तरुणांचे संघटन केले आहे. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तो लढत होता. कोरोना काळातही प्रवीणने जीवावर उदार होऊन कार्य केले."
प्रवीणने मराठा समाजासाठी सुरू केलेल्या कार्यात लांडगेंनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. त्यावर लांडगे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पाठपुरावा करणार आहे. यापुढील काळात मराठा समाजाच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.