चांगले काम करा; सरकार तुमच्यासोबत : अजितदादांचा जयश्री जाधवांना शब्द

आमदार जयश्री जाधव यांनी घेतली शरद पवार, अजित पवार यांची भेट
चांगले काम करा; सरकार तुमच्यासोबत : अजितदादांचा जयश्री जाधवांना शब्द
Ajit Pawar, Jayshree Jadhav meet to Sharad Pawar and Ajit Pawar, Ajit Pawar News Updates, Jayshree Jadhav News UpdatesSarkarnama

कोल्‍हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी आज (ता. १९ एप्रिल) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar), तर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. दोघांनीही विजयाबद्दल जयश्री जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरचे जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. चांगले काम करा; महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी दिला. (MLA Jayshree Jadhav meet to Sharad Pawar and Ajit Pawar)

उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपविरुद्ध आघाडी अशी चुरस झाली. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा येथे झाल्या. त्यामुळे राज्यात निवडणूक चर्चेची ठरली. विजयानंतर आज आमदार जाधव मुंबईत पोचल्या. तेथे त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली.

Ajit Pawar,  Jayshree Jadhav meet to Sharad Pawar and Ajit Pawar, Ajit Pawar News Updates,  Jayshree Jadhav News Updates
राज्यपालांच्या शिफारसपत्रावर भोंडवे म्हणाले, ‘आमचे एकच बॉस...अजितदादा!’

उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हापूर उत्तरच्या नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे. तसेच, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही अजितदादांनी आमदार जयश्री जाधव यांना दिली. जाधव यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

Ajit Pawar,  Jayshree Jadhav meet to Sharad Pawar and Ajit Pawar, Ajit Pawar News Updates,  Jayshree Jadhav News Updates
मिरजच्या उमेदवाराचा एबी फॉर्म खिशात घेऊन फिरतोय...तयारीला लागा !

या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.