Jaykumar Gore : अखेर जिल्हा न्यायालयात शरण; ती सही त्यांचीच!

वादग्रस्त प्रतिज्ञापत्रावरील सही Signature on disputed affidavit ही आमदार गोरेंचीच MLA Jaykumar Gore असल्याचा हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल Handwriting Expert Report न्यायालयापुढे ठेवला आहे.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama

सातारा : मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे शरण आले. आता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मायणी येथील मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली होती.

MLA Jaykumar Gore
मायणी, वरकुटेवाल्यांनी माझ्या नादाला लागू नये: गोरे

त्यानंतर वडुज येथील सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर आमदार गोरेंच्यावतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना आमदार गारेंना अटकेपासून संरक्षण दिले होते. पण तेथेही जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आमदार गोरेंना अटकेपासून दिलासा देत त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात शरण येऊन तेथेच जामीन घेण्याचे आदेश दिले होते.

MLA Jaykumar Gore
Maan : एमआयडीसीच काय, साधे कसपाटही माणच्या बाहेर जाऊ देणार नाही... जयकुमार गोरे

त्यानुसार आमदार जयकुमार गोरे हे सातारा जिल्हा व सत्र न्यायालयापुढे आज शरण आले. आता त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालय काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने मिलिंद ओक हे काम पहात असून त्यांनी वादग्रस्त प्रतिज्ञापत्रावरील सही ही आमदार गोरेंचीच असल्याचा हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल न्यायालयापुढे ठेवला आहे. त्यामुळे आमदार गोरेंच्या जामीन अर्जावर काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

MLA Jaykumar Gore
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाचा दणका

याच दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा तपासी अधिकारी बदलला होता. तो कोरेगावचे पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्याकडे सोपवला होता. अचानक तपासी अधिकारी बदलल्याने तक्रारदाराने पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुन्हा पूर्वीच्याच तपासी अधिकाऱ्यालाच नेमण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com