Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Devendra Fadanvis, Jaykumar Goresarkarnama

Jaykumar Gore News : जयकुमार गोरेंनी शब्द खरा केला; बिजवडीसह 21 गावांना जिहे कटापूरचे पाणी मिळणार

Jaykumar Gore उत्तर माणच्या जनतेला पाणी मिळवून देणार, अन्यथा 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा शब्द जयकुमार गोरे यांनी येथील जनतेला दिला होता

Maan Jaykumar Gore News : माणच्या उत्तरेकडील गावांचा कोणत्याच सिंचन योजनेत समावेश नसल्याने या गावांना पाणी मिळणार की नाही हा प्रश्न होता, पण दिलेला शब्द पाळण्यात तरबेज असणारे आमदार जयकुमार गोरे यांनी हा शब्द खरा ठरवत बिजवडीसह 21 गावांचाही या योजनेत समावेश केला. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत यश मिळवले.

वर्षानुवर्षे विविध सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या उत्तर माणच्या जनतेला पाणी मिळवून देणार, अन्यथा 2024 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा शब्द आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर माणच्या Maan taluka जनतेला दिला होता.

तो शब्द खरा करण्यासाठी जयकुमार गोरेंच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सहकारी खंबीरपणे उभे होते. सातत्याने पाठपुरावा करत पहिल्या टप्प्यात उत्तर माणकडील 16 गावांसाठी जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेची मान्यता आणून त्याचे भूमिपूजन करून कामही सुरू करून दाखवले.

तर नुकतीच माण उत्तरच्या उर्वरित गावांसाठीही सुधारित मान्यता घेत या गावांचा या योजनेत समावेश केला. त्यांच्यासाठी 1.1 टीएमसी पाणी देण्यास मंजुरी आणत उत्तर माणच्या जनतेला दिलेला शब्द जयकुमार गोरे यांनी खरा करून दाखवला. याबद्दल उत्तर माणमधील जनतेकडून त्यांचे आभार मानण्यात आले.

Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Satara ST News : साताऱ्यातील १७३ हून अधिक एसटी बस कालबाह्य; नवीन २०० बसची व्यवस्था करा : श्रीनिवास पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माणदेशातील इंच ना इंच जमीन ओलिताखाली येईपर्यंत डोळे मिटणार नाही, असा आपण माण खटावच्या जनतेला शब्द दिला होता. मी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्यासाठी आजपर्यंत जिवाचे रान केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठबळावर जनतेला दाखवलेले पाण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाताना समाधान वाटत आहे.

-आमदार जयकुमार गोरे

Edited By Umesh Bambare

Devendra Fadanvis, Jaykumar Gore
Maan BJP News : जनतेची लूट केल्याने त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागले : विखे- पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com