सत्ता गेली; पण जयंत पाटलांचा तोरा अजूनही कायम : पडळकरांनी साधला निशाणा

आमदार गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटील यांच्यावर टीका
Gopichand Padlkar-Jayant Patil
Gopichand Padlkar-Jayant PatilSarkarnama

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) जे काही बोलले ते महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. त्यांची आज सत्ता गेलेली आहे. पण, जयंत पाटलांसारख्या माणसाचा माज अजूनही गेलेला नाही. त्यांच्या माजोरडपणा अजूनही जायला तयार नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या कामाचा उल्लेख करताना पाटलांनी त्यांच्या समाजाचा उल्लेख केला. म्हणजे यांच्या डोक्यातून अजून जातीयवाद जायला तयार नाही, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. (MLA Gopichand Padalkar criticizes Jayant Patil)

विधानसभेच्या पहिल्या दिवशीचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पडळकर यांनी जयंत पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडले. विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी आदिवासी समाजातून येऊन झिरवळ यांनी अतिशय चांगले काम केले आहे, असा उल्लेख केला हेाता. त्यावरून पडळकरांनी पाटलांवर टीका केली.

Gopichand Padlkar-Jayant Patil
हकालपट्टीनंतर उद्धव ठाकरेंचा आढळरावांना फोन; व्यक्त केली हळहळ!

पडळकर म्हणाले की, विधानसभेत नव्या अध्यक्षांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव चर्चिला गेला. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षाचे प्रमुख यांनी त्यांच्या भावना मांडल्या. अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना पाटील जे काही बोलले, ते सर्वांच्या पुढं आलेलं आहे. त्यांची आज सत्ता गेलेली आहे. पण, जयंत पाटलांसारख्या माणसाचा माज अजूनही गेलेला नाही. त्यांच्या माजोरडपणा अजूनही जायला तयार नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी खूप चांगल्या प्रकारचे काम गेल्या दोन अडीच वर्षांत केले आहे. हे सर्व सभागृह आणि महाराष्ट्र जाणून आहे. त्यांचा उल्लेख करत असताना जयंत पाटलांनी त्यांच्या समाजाचा उल्लेख केला. म्हणजे यांच्या डोक्यातून अजून जातीवाद जायला तयार नाही.

Gopichand Padlkar-Jayant Patil
शरद पवारांकडून मला दोनदा राज्यसभेवर पाठविण्याची ऑफर होती : आढळरावांचा गौप्यस्फोट

आदिवासी, मागासवर्गीय, भटक्य जाती-जमाती या समाजातून एखादा लोकप्रतिनिधी पुढे येऊन चांगले काम करत असेल तर त्या लोकांचा अपमान करणे, त्या लोकांच्या समाजावर बोलणे अशी परंपरा या राष्ट्रवादीवाल्यांनी सुरू ठेवली आहे. या वक्तव्याबद्दल मी जयंत पाटील यांचा निषेध करतो. आपणच फार बुद्धीवान असल्याचे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. आपण काही तरी चांगलं या राज्यात करू शकतो, असे चित्र गेल्या काही वर्षांत उभे केले आहे. त्यांचा हा बुडबुडा येत्या काळात फुटल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Gopichand Padlkar-Jayant Patil
शिवसेनेत माझी काय किंमत, हे आता मला कळलं : हकालपट्टीच्या बातमीने आढळराव व्यथित

शिवसेना-भाजप युतीच्या आमदारांनी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. मात्र, महाविकास आघाडीला त्यांचे आमदार फुटतील, असे वाटत होते, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक घेतली नाही. भाजप-शिवसेना युतीचे आमदार नार्वेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in