Deepak Kesarkar : अजितदादांचा आम्हाला अभिमान ; शिंदे गटाच्या मंत्र्याकडून कौतुक

Deepak Kesarkar : कटुता कमी करणे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी त्यांचा आदर करणारा मनुष्य आहे.
Deepak Kesarkar, ajit pawar
Deepak Kesarkar, ajit pawarsarkarnama

Deepak Kesarkar : शिंदेगटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी केसरकरांनी विविध विषयांवर भाष्य केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याचेही दिपक केसरकर यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या केसरकरांनी आज अजित पवार (ajit pawar)यांचे कौतुक केलं.

"मी अजित पवार यांच्याबरोबर काम केलेले आहे. बोलताना फटकऴ बोलतील पण एक विरोधी पक्ष नेता कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण आहेत. जसा आम्हाला मुख्यमंत्र्याचा अभिमान आहे. तसा आम्हाला अजित पवारांचा देखील अभिमान आहे," अशा शब्दात केसरकरांनी अजितदादांचे कौतुक केले.

Deepak Kesarkar, ajit pawar
Sanjay Raut : राहुल गांधींना विचारलेला प्रश्न शेतकऱ्यांना का विचारत नाही ; राऊतांचा सवाल

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे. तसाच अभिमान आम्हाला विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादांचा आहे. अजितदादा पवार निर्मळ मनाचं व्यक्तीमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे, असे केसरकर म्हणाले. नववर्षानिमित्त तुम्ही साईबाबांकडे काय मागितले, या प्रश्नावर केसरकर म्हणाले, "साईबाबांकडे काही मागण्याची गरज पडत नाही ते सर्व काही देतात. राज्यात सुख-समृद्धी नांदावी म्हणून साईं चरणी प्रार्थना केली, असं केसरकर म्हणालेत.

Deepak Kesarkar, ajit pawar
Karnataka Assembly Elections : भाजपचं ठरलं ; अमित शाह यांची मोठी घोषणा

विरोधी पक्षनेता अजितदादांसारखा असावा..

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावर केसरकर म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या मात्र धर्म नाही बदलला. शब्दछल करण्यात काही महत्व नाही. विरोधी पक्षनेते अजित पवार हे बाहेरून कठोर असले तरी त्यांचं मन मात्र निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतीत मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजितदादांसारखा असावा,"

पण उद्धव ठाकरेंनी ऐकले नाही..

उद्धव ठाकरेबाबत केसरकर म्हणाले, "कटुता कमी करणे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी त्यांचा आदर करणारा मनुष्य आहे. उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलेले नव्हते. जेव्हा घर पेटतं तेव्हा अगोदर आग विझवावी लागते. असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. मात्र टीव्हीवर जे दाखवण्यात आले त्याचे दु:ख वाटले,

ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावे..

"पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. शिंदेंनी आमदारांची मने जिंकली. त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्यासोबत गेलो. अस काय घडलं की, आम्ही त्यांच्याबरोबर गेलो याचे उत्तर आम्ही वेळ आल्यावर देऊ. ते काय घडल याच आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करावे, असे केसरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com