Sangli : मुले चोरणारी टोळी समजून साधूंना जबर मारहाण

Sangali : चौकशी केली असता, ते मथुरा येथील खरे साधू असल्याचे समोर आले आहे.
Sangali Sadhu
Sangali SadhuSarkarnama

सांगली : उत्तरप्रदेशच्या चार साधूंना मुले चोरणारी टोळी समजून जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी ही घटना घडली आहे. कर्नाटक मधून जत मार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना या चार साधूंना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात साधूंकडून पोलिसांकडे त्यांनी फिर्याद दिली नाही. मारहाणी झालेल्या दुखापतीमुळे उपचार घेऊन ते पुढे पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मात्र स्वत: पोलिसांनी याची दखल घेत, या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातून कर्नाटक मार्गे जत तालुक्यातून हे चौघे साधू प्रवास करत होते. यावेळी उमदी या ठिकाणी साधूंनी एका तरुणाला पत्ता विचारला आणि या तरुणांनी ही मुले चोरणारी टोळी असल्याचे वाटले. तसा व्हिडिओ सुद्धा जत तालुक्यामध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. त्या तरुणाने गावकऱ्यांना या संबंधी सांगितले आणि त्यावेळी काल दुपारी गावकरी साधूंची चौकशी करू लागले. यावेळी गावकऱ्यांनी मुलं चोरणारी टोळी समजून त्यांना जबर मारहाण केली. यावेळी उमदी येथील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून साधूंना विचारपूस केली आणि ते साधूच असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना उपचार करून पंढरपूरकडे रवाना केले. मात्र उमदी पोलीस स्टेशन मध्ये कोणतीच तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत, सहा आरोपींना या ठिकाणी अटक केली आहे. गावामध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Sangali Sadhu
Goa Congress : सात महिन्यात 'या' चुकामुळे काँग्रेस फुटली..

साधूंनी आधार कार्ड दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक माहिती विचारली असता, त्यांच्या नातेवाईकांची मोबाईल क्रमांक त्यांच्याकडून मिळाले. या चौघा साधूंची उत्तर प्रदेश मधल्या मथुरा या ठिकाणी चौकशी केली असता, ते मथुरा येथीलच खरे साधू असल्याचे समोर आले आहे. हे सर्व श्री पंचनाम जुना आखाडा येथील साधू असल्याचं स्पष्ट झाले, त्यामुळे ही मुले चोरी करणारी टोळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in