मिशन जरंडेश्वर कारखाना; किरीट सोमय्या साताऱ्यात दाखल

आता ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे कोणते नवे आव्हान निर्माण करणार याची उत्सुकता आहे.
Ajit pawar, krit somayya
Ajit pawar, krit somayyasarkarnama

सातारा : जरंडेश्वर कारखाना विक्री घोटाळाप्रकरणी माहिती घेण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी भाजपचे नेते माजी खासदार सोम्या किरीट सोमय्या यांचे आज पहाटे साताऱ्यात आगमन झाले. सातारा रेल्वे स्टेशनवर त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामी थांबले होये. सकाळी साडेनऊ वाजता ते जरंडेश्वर कारखान्याकसाठी कोरेगाव कडे रवाना झाले. कोरेगावात यांचे स्वागत केल्यानंतर ते चिमणगांव येथील जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहेत. जरंडेश्वर कारखान्याची पाहणी व शेतकरी सभासद यांच्याशी चर्चा करणार आहेत.

Ajit pawar, krit somayya
सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार

आता ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे कोणते नवे आव्हान निर्माण करणार याची उत्सुकता आहे. कोरेगावनंतर ते फलटणमार्गे बारामतीला जाणार आहेत. फलटणमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घरी ते थांबणार आहेत. त्यानंतर बारामतीला जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com