Maan : गोरेंच्या वकिलांकडून जनतेची दिशाभूल... महादेव भिसे यांचा आरोप

आमदार गोरेंचा Jaykumar Gore यांचा कर्मावर विश्वास असेल अन् ते न्यायव्यवस्थेचा आदर करत असतील तर त्यांनी वडूज Waduj येथील न्यायालयात Court तातडीने हजर होणे अपेक्षित आहे, असेही श्री. भिसे यांनी म्हटले आहे.
Crime
Crimesarkarnama

मायणी : ॲट्रॉसिटी प्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असून त्यांना वडूज जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण जाऊन जामीनासाठी अर्ज करण्याचे आदेश दिलेत. मात्र, त्यांचे वकील ॲड. खोत यांनी माध्यमांना खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. त्याविरुद्ध कायदेशीर सल्ला घेऊन अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती तक्रारदार महादेव भिसे यांनी दिली आहे.

त्याबाबत भिसे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, त्यांचे मयत वडील पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात आमदार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज जिल्हा सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.

Crime
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाचा दणका

त्यानंतर गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात (सुप्रीम कोर्टात) धाव घेतली होती. मात्र, तेथेही त्यांना दिलासा मिळालेला नाही. नुकत्याच झालेल्या सुनावणीत, ट्रायल कोर्टाला शरण जाऊन रीतसर जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गोरेंना दिले आहेत. त्यांना अटकेपासून चार आठवड्याचे संरक्षण दिलेले नाही. तरीही, गोरेंचे वकील ॲड.अरुण खोत यांनी जनतेकडून सहानुभूती मिळवण्यासाठी माध्यमाद्वारे खोटी माहिती दिल्याचे दिसून येत आहे.

Crime
मायणी, वरकुटेवाल्यांनी माझ्या नादाला लागू नये: गोरे

त्यांच्याकडून लोकांत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत असून याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्यात येईल, असे भिसे यांनी स्पष्ट केले आहे. आमदार गोरेंचा त्यांच्या कर्मावर खरच विश्वास असेल, अन् ते न्यायव्यवस्थेचा आदर करत असतील तर त्यांनी वडूज येथील न्यायालयात तातडीने हजर होणे अपेक्षित असताना, समाज माध्यमातून थिल्लरपणा करण्यात ते धन्यता मानत आहेत, असेही श्री. भिसे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com