
सांगली : सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (Dr. Vishwajeet Kadam) सोमवारी (१८ एप्रिल) सांगलीतील (Sangli) पलूस तालुक्यातील बुरली येथे विकास कामाच्या उद्घाटनासाठी गेले होते. पण या दौऱ्यातील विश्वजित कदमांचा एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे.
सांगलीतील विकास कामाचे उद्घाटन संपवून विश्वजित कदम सकाळीच कार्यकर्त्यांच्या घरी भेटीसाठी निघाले होते. त्याचवेळी सकाळची शाळा सुटली होती आणि काही चौथी-पाचवीचे विद्यार्थी रस्त्याच्या कडेला थांबले होते. मुलांना थांबलेलं पाहून विश्वजित कदमही गाडीतून उतरले आणि थेट मुलांकडे निघाले. विश्वजित कदमांना येताना पाहून मुलांनी थेट, काय साहेब काय चाललंय, असा सवाल विचारला. मुलांचा हा प्रश्न ऐकून काही क्षणासाठी विश्वजित कदमही अवाक् झाले. मुलांच्या प्रश्नावर उत्तर देत म्हणाले, माझं बर आहे, असं उत्तरदिलखुलास उत्तर देत मंत्री विश्वजित कदम यांनी मुलांशी संवाद साधला.
विश्वजित कदम विद्यार्थ्यांशी नेहमीच संवाद साधताना दिसतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा कायम प्रयत्न असतो. अनेकदा विद्यार्थ्यांना वहीवाटप कऱणे शैक्षणिक शिष्यवृत्ती, क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात.
गेल्या महिन्यातही त्यांनी विधानसभेत राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार (कोटपा) तंबाखूमुक्त शाळा कलमांचे आणि मार्गदर्शन सूचनांचे योग्य प्रकारे पालन केले गेले पाहिजे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील,’ असेही विश्वजित कदम यांनी विधानसभेत सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.