साई मंदिरातील फूल-हार विक्रीबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री विखेंनी केली समिती गठीत

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी शिर्डी ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाशी चर्चा केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Paresh Kapse

Radhakrishna Vikhe Patil : शिर्डीमधील साईबाबांच्या मंदिरात मागील 10 महिन्यांपासून फूल-हार विक्रीवर बंदी आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाने बंदीचा निर्णय घेतला आहे. या विरोधात काल ( शुक्रवारी ) फूल-हार विक्रेत्यांनी मंदिरात हार, फुले व प्रसाद घेऊन शिरण्याचा प्रयत्न केला होता. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी शिर्डी ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाशी चर्चा केली. त्यांनी साई मंदिरातील फूल-हार विक्रीबाबतचे धोरण ठरविण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. शिर्डीतील वादा संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सामोपचाराची भूमिका घेण्यास विखे पाटलांना सांगितले होते, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याशी चर्चा करून भाविकांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा विचार करून या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूलमंत्र्यानी शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व शिर्डी ग्रामस्थांची चर्चा केली. फूल-हार बंदीवरील भूमिका जाणून घेतल्या. या बैठकीला श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे आदी अधिकारी तसेच संस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील सातव्यांदा शपथबद्ध : ६ मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा अनुभव गाठीशी

श्री.साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर संस्थान सभागृहात महसूलमंत्र्यांनी शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तांची फूल-हार बंदीवरील मते जाणून घेतली. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांशी फूल-हार बंदी बरोबरच शिर्डीतील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

या बाबत पत्रकारांना माहिती देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिर्डीच्या साईबाबा मंदिरात असलेल फूल-हारांची बंदी तूर्तास कायम असून फूल-हारांवरील निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण ठरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर याबाबत शासनस्तरावरून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अशा शब्दात त्यांनी शिर्डी ग्रामस्थांना आश्वस्त केले. त्याचबरोबर शिर्डी शहर व परिसर शंभर टक्के गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्याची माहिती ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.

Radhakrishna Vikhe Patil
शिर्डीत फूल विक्रेते चिडले : सुरक्षारक्षकांशी भिडले

ते पुढे म्हणाले की, मंदिरात फूल-हार विक्रीबाबत दोन मतप्रवाह आहेत. यात ग्रामस्थांचीही काही भूमिका आहे. फूल उत्पादक शेतकरी व विकेत्यांची ही काही भूमिका आहे. यामुळे याविषयावर घाई-घाईने निर्णय होण्यापेक्षा सुवर्णमध्य ठरवून निर्णय होणे रास्त आहे. यासाठी सर्वंकष धोरण ठरविणे गरजेचे आहे. तेव्हा यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीत साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक व जिल्हा कृषी अधीक्षक यांचा समावेश असणार आहे. या समितीने आपला अहवाल 30 दिवसांच्या आत शासनाला सादर करायचा आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर शासन याबाबत योग्य तो निर्णय घेईल.

शिर्डी शहर व परिसर शंभरटक्के गुन्हेगारीमुक्त झाला पाहिजे. सोनसाखळी चोरी, गुंडगिरी, अवैध व्यवसाय, गांर्दूल्याचा उच्छाद, भाविकांची लूट, अवैध धुम्रपान, चरस-गांजा-गुटखा विक्री यासारख्या अनेक गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. झिरो टॉलरन्स धोरण राबवून पोलिसांनी गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करावे. गुन्हेगारी विषयावर पुन्हा बैठक घेण्याची वेळ येऊ देऊ नये. अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी पोलीस विभागाला दिल्या.

Radhakrishna Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil : नगर-शिर्डी महामार्गासाठी सुजय विखेंचे गडकरींना साकडे

शिर्डीतील अंतर्गत रस्त्यांचा चारही बाजूंनी विस्तार झाला आहे. शहर झोपडीपट्टी मुक्त करण्यासाठी प्रशासन पावले उचलत आहे. शिर्डीच्या वैभवात भर पडत आहे. त्यामुळे हे वैभव कोठेही कमी होऊ नये यासाठी व्यावसायिक दुकानदार, हॉटेल चालक यांनी अतिक्रमण करू नये. शहरातील अतिक्रमणांवर शिर्डी नगरपरिषदेने त्वरित कार्यवाही करण्यासाठी पावले उचलावीत. अशा सूचना त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.

तलाठी कार्यालयाचे स्थलांतर, उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र शासकीय इमारत याविषयांवर ही यावेळी महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com